मराठी बातम्या /बातम्या /Viral /इंटरनेटवरील सर्वात सुंदर Video, कुत्र्याचं वागणं पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल

इंटरनेटवरील सर्वात सुंदर Video, कुत्र्याचं वागणं पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

कुत्र्याचा एक असा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई १६ नोव्हेंबर : सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साईटवर अकाउंट आहे. त्या ठिकाणी अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पोस्ट आणि शेअर करतात. काही जणांना तर सोशल मीडियाची इतकी आवड आहे की, दिवसभरात आपण काय-काय केलं याचेदेखील अपडेट ते सोशल मीडियावर देतात. लोकांच्या अशा सवयींमुळे अनेकदा सोशल मीडिया साईट्सवर अनोखे व्हिडिओज पहायला मिळतात.

  काही व्हिडिओ गंमतीशीर असतात तर काही व्हिडिओ लोकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारे असतात. असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन ट्रेंडिंग लिस्टमध्ये एकदम टॉपलासुद्धा राहतात. सध्या असाच एका श्वानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

  हा व्हिडिओ बघून, अनेक नेटिझन्सच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. व्हिडिओतील श्वान चक्क मंदिराबाहेर देवाच्या पाया पडताना दिसत आहे.

  हे ही पाहा : Video : ना माणुस ना बकरी... अजगराच्या पोटातून जे बाहेर आलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही

  पाळीव प्राण्यांमध्ये श्वान हा सर्वांत लोकप्रिय प्राणी आहे. कारण, श्वान अतिशय हुशार आणि प्रामाणिक प्राणी आहे. आपण त्यांना शिकवलेल्या सर्व गोष्टी ते अगदी सहजपणे आत्मसात करतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गणपती मंदिरासमोर उभं राहून गणपतीला हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

  या व्यक्तीसोबत असलेला श्वान तिचं अनुकरण करतो आणि पुढील दोन पाय जोडून निम्मं शरीर पुढे झुकवून गणपतीबाप्पाचं दर्शन घेतो असं दिसतंय. एका वाटसरूनं गणपतीचा आशीर्वाद घेणाऱ्या या श्वानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं दिसत आहे.

  इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला गणपतीचं एक गाणंही जोडण्यात आलं आहे.

  या व्हिडिओचं लोकेशन कळू शकलेलं नाही. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये एका युजरनं या व्हिडिओमधील व्यक्तीचं नाव विशाल असून, हे गणपती मंदिर पुण्यातील असल्याचं सांगितलं आहे. "या व्यक्तीचं नाव विशाल आहे. तो तुम्हाला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भेटेल," अशी कमेंट एका युजरनं केली आहे.

  सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच प्राणीप्रेमी आणि गणपती भक्त असलेल्यांना कमेंट्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. दर्शन घेणाऱ्या श्वानाबद्दल अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 'बाप्पासमोर सगळेच जीव नतमस्तक होतात,' अशी कमेंट एकानं केली आहे तर काहींनी 'गणपती बाप्पा मोरया' असं म्हटलं आहे.

  काही युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी टाकले आहेत. एकूणात काय प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश असतो असं आपण म्हणतो त्याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे असं म्हणता येईल.

  First published:

  Tags: Dog, Social media, Videos viral, Viral