जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पेट्रोलवर चालणारी कार कोणत्या स्पीडवर देते Best Mileage, तुम्हाला माहितीय का ही ट्रिक?

पेट्रोलवर चालणारी कार कोणत्या स्पीडवर देते Best Mileage, तुम्हाला माहितीय का ही ट्रिक?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या स्पीडने तुम्ही सर्वोत्तम मायलेज मिळवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : गाडीचा मायलेज खिशावर थेट परिणाम करतो. म्हणून बहुतांश लोक हे गाडीचा मायलेज पाहून गाडी विकत घेतात. ज्यामुळे कमी पेट्रोलमध्ये त्याला दुरचा प्रवास करता येईल. पण नुसतं गाडीचं मायलेज पाहून फायदा नाही कारण यामध्ये महत्वाचा असतो तो गाडीचा वेग. हा वेग तुमच्या गाडीच्या मायलेजसाठी महत्वाचा आहे. मग आता प्रश्न असा की गाडी वेगाने चालवल्यामुळे चांगलं मिळेल की कमी वेगाने चालवल्यावर जास्त मायलेज मिळेल? कमी वेगाने गाडी चालवल्याने चांगला मायलेज मिळतो, असा अनेकांचा समज आहे, पण हे खरे नाही. दुसरीकडे, जास्त वेगाने गाडी चालवणे देखील मायलेजसाठी धोकादायक ठरू शकते. कार चालवताना चांगल्या मायलेजसाठी, योग्य वेगाने योग्य गियर टाकणे ही आवश्यक आहे. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारमध्ये चुकून रिवर्स गेअर टाकला तर काय होईल? येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या स्पीडने तुम्ही सर्वोत्तम मायलेज मिळवू शकता. ऑटोमोबाईल तज्ञांच्या मते, कारचे सर्वोत्तम मायलेज सहसा 70-100 kmpl च्या वेगाने मिळते. या वेगाने कार टॉप गिअरमध्ये चालवणे आवश्यक आहे. पण ही स्पीड सहसा महामार्गांवरच शक्य आहे. सिटीमध्ये ट्रॅफिकमुळे वेगाने गाडी चालवता येत नाही मग अशावेळी काय करावं? वास्तविक, तुम्ही कार कोणत्याही गीअरमध्ये चालवल्यास, तिचा RPM 1500 ते 2000 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा. आजकाल प्रत्येक कारमध्ये स्पीडोमीटरसह RPM मीटर आहे. हे इंजिनवरील दबाव दर्शवते. RPM जास्त असेल तर, इंजिनला काम करणे अधिक कठीण असते. त्यामुळे हा काटा 1500 ते 2000च्या वर जाऊ देऊ नका. तो काटा वर जात असेल तर एकतर स्पीड कमी करा किंवा मग गेअर अप करा. विमानाचं मायलेज किती असू शकतं? तुम्ही अंदाजाही लावू शकणार नाही इतका मोठा आकडा शहरात हळू चालवल्यामुळे अनेकदा मायलेज कमी होते. शहरी भागात दुसऱ्या गिअरमध्ये कार चालवणे अनेकदा चांगले असते. कोणत्या गिअरमध्ये गाडी किती वेगाने चालवायची ते जाणून घेऊ, ज्यामुळे मायलेज चांगलं मिळेल. पहिला गिअर - 0 ते 20 Speed. दुसरा गिअर - 20 ते 30 Speed. तिसरा गिअर - 30 ते 50 Speed. चौथा गिअर - 50 ते 70 Speed. पाचवा गिअर - 70 पेक्षा जास्त वेग जर 6 वा गिअर असेल तर तुम्ही 100 Speed करू शकता. वाहनाचा वेग कमी असेल तर मायलेज कमी कसे होईल असा प्रश्न काहींना पडेल. जर तुम्ही उच्च गीअरमध्ये कमी वेगाने कार चालवली तर ते इंजिनवर अधिक भार टाकते आणि इंधनाचा वापर वाढवते. दुसरीकडे, कमी गीअरमध्ये कमी वेगाने वाहन चालवताना जास्तीत जास्त इंधनाचा वापर होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात