कोणतीही गोष्ट विकत घेताना आपण त्याबद्दल संपू्र्ण गोष्ट जाणून घेतो. मग तो मोबाईल फोन, लॅपटॉप असोत, गाडी किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु.
इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे फीचर्स, तसेच गाडीचे मायलेज आणि फिचर्स आपण जाणून घेतो, कारण या सगळ्याच गोष्टीचा आपल्या खिशावार परिणाम होतो.
आता मायलेज म्हणजे नेमकं काय तर, एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये ते वाहन किती किलोमीटर प्रवास करू शकते. वेगवेगळ्या कंपनीचं वाहन वेगवेगळं मायलेज देतं.
आपण साधारण कार किंवा बाईकचा मायलेज माहिती करुन घेऊ शकतो. पण तुम्ही कधी विचार केलाय की हवेत उडणाऱ्या विमानाचं मायलेज काय असावं? किंवा विमानासाठी किती इंधन लागत असावं?
विमानाला उडण्यासाठी सहाजिकच इंधन लागतं पण हे इंधन पेट्रोल-डिझेलपेक्षा वेगळे आहे. इंधनाचा वापर जाणून घेण्यासाठी, सर्वात मोठ्या बोईंग 747 विमानाबद्दल जाणून घेऊ.
बोइंग विमान प्रति सेकंद सुमारे 4 लिटर इंधन वापरते. त्यानुसार एका मिनिटाच्या प्रवासासाठी 240 लिटर इंधन लागते. हा विमान एक लिटर इंधनात सुमारे 0.8 किलोमीटर अंतर कापतो, म्हणजेच एका किलोमीटरमध्ये 12 लीटर इंधन वापरते.
या विमानात 568 लोक प्रवास करू शकतात. बोईंग 747 विमान हे मालवाहतूक आणि मोठे व्यावसायिक विमान आहे. या विमानाला जंबो जेट किंवा क्वीन ऑफ द स्काय असेही म्हणतात.