जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारमध्ये चुकून रिवर्स गेअर टाकला तर काय होईल?

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारमध्ये चुकून रिवर्स गेअर टाकला तर काय होईल?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

उत्तर जाणून घेण्यासाठी थेट रिवर्स गेअर टाकून कोणालाही धोका पत्कारण्याची हिंमत तर कोणीच करणार देखील नाही. मग आता याचं उत्तर मिळणार कसं?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : तुमच्यापैकी अनेकांनी कार चालवली असेलच. सीटीच्या किंवा लोकल रस्त्यावर गाडी चालवताना गाडी पहिल्या किंवा दुसऱ्या गेअर वरती चालते. पण जेव्हा आपण हायवेवरती गाडी पळवतो, तेव्हा मात्र ती आपण अगदी चौथ्या ते पाचव्या गेअरवर पळवतो. अशावेळी अनेक वेळा अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की गाडी स्पीडमध्ये धावताना चूकून रिवर्स गेअर पडला तर काय होईल? या एका विचाराने अनेक लोक गाडी चालवताना अस्वस्थ असतात. आता उत्तर जाणून घेण्यासाठी थेट रिवर्स गेअर टाकून कोणालाही धोका पत्कारण्याची हिंमत तर कोणीच करणार देखील नाही. मग आता याचं उत्तर मिळणार कसं? असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो. चला याबद्दल जाणून घेऊ.. आता हे लक्षात घ्या की वेगवेगळे ट्रान्समिशन असलेल्या कारसाठी याचे प्रभाव वेगवेगळे आहेत. होय, मॅन्युअल आणि स्वयंचलित कारमध्ये परिणाम पूर्णपणे भिन्न आहे. थरकाप उडवणारा Video, युटर्न घेताना स्कॉर्पिओची भरधाव बाईला धडक आणि… मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये काय होईल? नव्या युगातील कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची प्रणालीही बदलली आहे. जर तुम्ही मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली कार चालवत असाल. तर तुम्ही गाडी चालवताना आणि स्पीडमध्ये असताना सहजासहजी रिव्हर्स गियर टाकू शकणार नाही. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये फिजिकल लॉक असतात. त्यामुळे गाडी चालवताना गिअर रिव्हर्समध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करणे जवळपास अशक्य आहे. म्हणजेच, गियर लीव्हर घट्ट असेल. यानंतरही जर तुम्ही त्यात बळाचा वापर केला तर गिअरबॉक्समधून आवाज यायला सुरुवात होईल. गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? चुकून जरी तुम्ही ते हलवले तरी धक्क्याने वाहन थांबू शकते. तसेच, गिअरबॉक्समधून मोठ्याने आवाज येईल. त्याचे काही घटक झिजतील आणि तुटतील. एवढेच नाही तर वाहनही उलटी होऊ शकतं. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारमध्ये काय होईल? तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार चालवत आहात. तुम्ही गाडी चालवताना रिव्हर्स गियरमध्ये ठेवल्यास, मॅन्युअलमध्ये घडू शकते तसे काहीही होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ऑटोमॅटिक कारचा ट्रान्समिशन गिअरबॉक्स अशा प्रकारे प्रोग्राम केलेला असतो की तो लीव्हरने दिलेल्या कमांडला तंतोतंत प्रतिसाद देतो. या गाड्यांमध्ये रिव्हर्स इनहिबिट तंत्रज्ञान वापरले जाते, जे वाहनाला आदेशाचे पालन करण्यास सांगते. या चुकीवर कारमध्ये अलर्ट येईल. बीप ऐकू येईल. एकूणच काय तर या चालत्या गाडीत चुकूनही रिव्हर्स गियर लावता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात