मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे कधी मनोरंजक, तर कधी धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा एका थरारक अपघाताचा आहे. जो तुमच्या हृदयाचा ठोका चुकवेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका स्कॉर्पिओ कारने एका बाईकला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही बाईक हवेतच उडाली. व्यस्त रस्त्यावर एक स्कॉर्पिओ चालक युटर्न घेत होता, तेवढ्यात भरधाव वेगानं एक बाईक आली आणि ती स्कॉर्पिओला जोरात धडकली. ज्यानंतर ही बाईक हवेत उडाली आणि त्यावरील दोन्ही तरुण खाली आदळले आहे. या अपघातात बाईक चालकाची प्रकृती गंभीर आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला दुखापत झाली आहे.
या अपघाताचे दृश्य समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. हे दृश्य खरोखरंच धक्कादायक आहे. ही घटना चंद्रपूरमधील भद्रावती शहरातील आहे. जी चंद्रपूर-नागपूर महामार्गावर घडली.
युटर्न घेताना स्कॉर्पिओची भरधाव बाईला धडक, अंगावर काटा आणणारा Video
— News18Lokmat (@News18lokmat) April 5, 2023
ही घटना चंद्रपूरमधील भद्रावती शहरातील आहे. जी चंद्रपूर-नागपूर महामार्गावर घडली.#accindet #viralvideo #Shocking #viralvideo pic.twitter.com/dFVdN61Xfp
हा व्हिडीओ सर्वासमोर एक उदाहरण म्हणून आला आहे. जो पाहून रस्त्यावरुन चालताना तुम्हाला किती खबरदारी घेण्याची गरज आहे. हे दाखवत आहे.