जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दारुच्या नशेत लोकांच्या डोक्यात येतात अशा गोष्टी, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

दारुच्या नशेत लोकांच्या डोक्यात येतात अशा गोष्टी, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

शास्त्रज्ञांनी 21 देशातील 18 ते 34 वर्षामधील एकून 30 हजार लोकांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांनी त्यांचा रिसर्च पेपर ‘बीजेएम ओपन’ मध्ये प्रकाशीत केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 मे : शहरी भागात आजकाल दारु पिणं तसं कॉमन झालं आहे. पुरुषांपासून महिलांपर्यंत बहुतांश लोक दारु पितात. पण दारुच्या नशेत लोक नक्की काय विचार करतात? कधी असा प्रश्न पडलाय? दारु पिणं आणि माणसाची भावना यावर 2023 मध्ये एक संशोधन गेलं गेलं. त्यामध्ये असं समोर आलं की वेगवेगळ्या प्रकारची दारु ही तुमचा मुड वेगवेगळ्या प्रकारे बदलते. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. दारु जितकी जुनी तितकी चांगली, मग बिअरची एक्सपायरी डेट का असते? शास्त्रज्ञांनी 21 देशातील 18 ते 34 वर्षामधील एकून 30 हजार लोकांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांनी त्यांचा रिसर्च पेपर ‘बीजेएम ओपन’ मध्ये प्रकाशीत केलं. ज्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेल्या गोष्टी पाहू शकता. यामध्ये समभागी झालेल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची दारु प्यायला दिली आणि त्यामध्ये त्यांच्या स्वभावाचे परिक्षण केले गेले. तेव्हा असे आढळले की वेगवेगळ्या प्रकारची दारु पिणाऱ्या लोकांचं मन आणि मुड वेगवेगळ्या प्रकारचा होतो. Whisky आणि Whiskey मध्ये फरक काय? या दोन्ही दारु वेगळ्या असतात? दारु माणसाला राग आणू शकते, माणसाला रडवू शकते, तसेच माणसाला आनंदी करु शकते. रेड वाईन ही व्हाइट वाईनपेक्षा माणसाला जास्त सुस्त बनवते. त्यामुळे बिअर किंवा वाइन प्यायल्यावर माणसाला रिलॅक्स वाटतं. या रिसर्चमध्ये आढळलं की वेस्टर्न कन्ट्रीजमध्ये बिअर पिनं चांगलं मानलं जातं. तेथील बहुतांश लोक बिअर पितात म्हणून त्यांचा स्वभाव शांत आणि आनंदी आहे. संशोधनात असं देखील समोर आलं की, वारंवार दारु प्यायल्याने त्याची माणसाला सवय होते. मग स्वत:ला शांत करण्यासाठी आणि स्ट्रेस फ्री करण्यासाठी लोक वारंवार दारु पिऊ लागतात. पण वारंवार दारु पिण्याचे वाईट परिणाम देखील समोर आले आहेत. या संशोधनात सामील झालेल्या 40% लोकांनी असे सांगितले की, ब्रँडी, रम व्हिस्की किंवा स्कॉच सारखी दारु माणसाला कामुक करते. त्यांचं म्हणणं आहे की ही दारु प्यायल्याने ऊर्जावान आणि आत्मविश्वास देखील वाढतो. पण या प्रकारची दारु पिणारे लोक जास्त रागीट असतात. दररोज दारु पिणारे लोक कालांतराने कमकूवत होतात. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त आक्रमत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात