मुंबई : आज काल कोणताही कार्यक्रम असोत, तो बहुतांश वेळा दारुशिवाय पूर्ण होत नाही. मग ते कोणाचं लग्न असोत किंवा मग ऑफिसची पार्टी. दारु ही असतेच. आता दारुमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यामध्ये वाईन, व्हिस्की, बिअर, वोडका, रम, इत्यादी येतात. प्रत्येक दारुत अलकोहोलचं प्रमाण वेगळं आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते. प्रत्येक दारुची आपली वेगळी अशी खासियत देखील आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर असं म्हटलं जातं की दारु जितकी जुनी तितकी चवीला चांगली आणि महाग. पण असं असलं तरी काही दारुच्या बाटलीवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असेत, मग असं का? उदाहरणार्थ, व्हिस्की जितकी जुनी तितकी तिची किंमत जास्त. पण, बिअरच्या बाबतीत असं होत नाही. का…? बिअरवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?
वाइन डीलनुसार, जिन, वोडका, व्हिस्की, टकीला आणि रम यासारख्या मद्यांचे शेल्फ लाइफ जास्त असते. जर बाटली योग्यरित्या ठेवसी गेली तर ती बऱ्याच काळासाठी सुरक्षित मानली जाऊ शकते. पण, बिअरच्या बाबतीत असं होत नाही. बिअर खराब का होते? बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते डिस्टिल देखील नसते. म्हणूनच ठराविक वेळेनंतर तिची एक्सपायरी होते. दुसरीकडे, जिन, वोडका, व्हिस्की, टकीला आणि रम त्यांच्या उच्च अल्कोहोल सामग्रीमुळे खराब होत नाहीत. धान्य, पाणी आणि यीस्ट वापरून बीअर बनवली जाते. किण्वन प्रक्रियेदरम्यान बिअरला नैसर्गिकरीत्या होणार्या कार्बोनेशनमधून त्याची फिझ मिळते. त्यात हॉप्स देखील जोडले जातात, जे बिअरला स्थिर आणि संरक्षित करते. बिअर किती दिवसात प्यावी? वास्तविक, बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ४ ते ८ टक्के असते. त्यामुळे ते खूप लवकर ऑक्सिडायझेशन सुरू होते आणि खराब होते. बिअरचं झाकण काढल्यानंतर ती शक्य तितक्या लवकर वापरावे. बीअरसाठी हे चांगले आहे की ती उघडताच ती संपली पाहिजे. दारुच्या नशेत व्यक्तीचा धोकादायक स्टंट, झाडावर चढला आणि… Video Viral तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार तर, बिअरच्या बंद बाटलीच्या एक्सपायरी डेटच्या सहा ते आठ महिने आधी बिअर पिणे चांगले आहे. वास्तविक, बिअरची बाटली उघडल्यानंतर त्यातील कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. त्यानंतर ती पिण्यासाठी मजा येत नाही आणि ती एकदम साधी लागते. त्यामुळे ती उघडताच प्यावी. बिअरच्या बाटलीवर कोणतीही एक्सपायरी डेट असली तरी हे लक्षात घ्या की बिअर एकदा खोलली की तिची एक्सपायरी डेट लगेचच होते. त्यामुळे ती लगेच प्यावी.