मुंबई, 05 जून : झाडांच्या ठिकाणी जा, पार्कमध्ये जा किंवा मग घाणेरड्या जागेत. कुठेही गेलात तर तुम्हाला आजूबाजूला मच्छर नक्कीच मिळतील. हे मच्छर माणसांना चावतात. ज्यामुळे स्किनला तर त्रास होतोच. शिवाय आरोग्याला देखील धोका निर्माण होतो. डास चावल्याने मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू सारखे घातक आजार पसरतात. जीवशास्त्रानुसार डासांच्या सुमारे साडेतीन हजार प्रजाती आहेत. पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे डास हे फक्त माणसांनाच चावतात का? की ते इतर प्राण्यांना देखील टार्गेट करतात? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. अनेकदा आपण पाहिलं आहे की जेव्हा आपण एखाद्या उद्यानात किंवा बागेत फिरतो तेव्हा तिथे आधीच डासांचा समूह असतो. असे घडते कारण डास नर असो वा मादी, दोन्ही प्रकारच्या डासांना जगण्यासाठी ग्लुकोज किंवा साखर आवश्यक असते. डासांबरोबरच सर्व प्रकारचे कीटक साखर आणि ग्लुकोज पूर्ण करण्यासाठी फुलांचा रस पितात. Fun fact : कधी विचार केलाय की पक्षी ‘V’ आकारातच का उडतात? डास चावण्याबाबतचे विज्ञान सांगते की ज्याप्रमाणे अन्न खाणे हा मानवाच्या जीवनचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याचप्रमाणे माणसांना चावणे हा डासांच्या जीवनचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. डासांच्या अस्तित्वासाठी आपल्याला चावणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, मानव हा डासांच्या अन्नसाखळीचा भाग आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण फक्त मादी डास आपल्याला चावतात. जेव्हा मादी डास अंडी घालण्यास सक्षम असतात तेव्हा त्यांच्या पोषणासाठी फुलांचे अमृत पुरेसे नसते. अशा मादी डासांना अन्नामध्ये काही प्रमाणात प्रथिने आणि चरबीची देखील आवश्यकता असते. प्रथिने आणि चरबीची गरज शरीराची रक्त पिऊन भागवली जाते. मादी डास माणसांना आणि इतर प्राण्यांना फक्त रक्त पिण्यासाठी चावतात. याचाच अर्थ असा की डास फक्त माणसांनाच नाही तर इतर प्राण्यांना देखील चावतात. डासांचा पूर्णपणे नाश होऊ शकतो का? एकदा का कुठे डासांची उत्पत्ती झाली की मग तिथून डासांचे अस्तित्व कधीच नाहीसे होऊ शकत नाही कारण डास हे अतिउत्साही आणि संधीसाधू कीटक आहेत. जिवंत राहण्यासाठी डास नेहमीच नवनवीन पर्याय शोधत असतात. डास प्रत्येक वनस्पती किंवा प्राण्याला डंक मारतात जे कोणत्याही प्रकारे डासांना जगण्यास मदत करतात. गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? जंगलात असलेल्या मादी डास कोणाचे रक्त पितात? डास नेहमी मानवी रक्त पिण्यास प्राधान्य देतात, कारण ते त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतात. पण विशेषत: जंगलात माणसं नसतात, त्यामुळे जंगली पक्ष्यांचे रक्त पिऊन डास जिवंत राहतात. काही जंगली डास आहेत जे फक्त जंगली पक्ष्यांचे रक्त पितात. याशिवाय सरडा, कुत्रे-मांजर, साप, ससे, बेडूक, खारुताई यांसारख्या लहान प्राण्यांनाही डास चावतात. एवढेच नाही तर डास काही मोठ्या प्राण्यांना जसे की गाय, घोडा, कांगारू, वालबीज आणि इतर प्राणी चावतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.