• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Postmortem रूममध्ये कसं चालतं काम? महिला कर्मचाऱ्यानं सांगितला भीतीदायक अनुभव

Postmortem रूममध्ये कसं चालतं काम? महिला कर्मचाऱ्यानं सांगितला भीतीदायक अनुभव

पोस्टमार्टम हाऊसमधील वातावरण सामान्य नसतं. तिथे काम करण्यासाठी अतिशय कठोर मन असणं गरजेचं आहे. मात्र, काही लोकांना हे कामदेखील आवडतं.

 • Share this:
  नवी दिल्ली 01 जुलै : कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, हा निर्णय प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचा असतो. कोणाला इंजिनिअर बनायचं असतं, कोणाला वकील तर कोणाला IAS-IPS. मात्र, याशिवायही काही कामं अशी आहेत, जी करण्याचा विचार करुनच अनेकांचा थरकाप उडतो. यातीलच एक काम आहे पोस्टमार्टम हाऊसमध्ये जॉब (Job in Post Mortem House) करणं. पोस्टमार्टम हाऊसमधील वातावरण सामान्य नसतं. तिथे काम करण्यासाठी अतिशय कठोर मन असणं गरजेचं आहे. मात्र, काही लोकांना हे कामदेखील आवडतं. यातीलच एक आहे, Alexandria Bowser. तिनं आपला अनुभव शेअर करत सांगितलं, की प्रत्यक्षात पोस्टमार्टम रूममध्ये (Post Mortem Room) काय होतं? शक्यतो एका अॅनाटोमिकल पॅथोलॉजी टेक्नोलॉजिस्ट आणि पॅथोलॉजिस्टकडून हे पोस्टमार्टम केलं जातं. पोस्टमार्टमच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं, की मृत्यूचं नेमकं कारण काय आहे. यादरम्यान शरीरावरील जखमा, खुणा आणि मेडिकल याबाबत विस्तृत रिपोर्ट तयार केला जातो. पॅथोलॉजिस्ट आणि अॅनाटोमिकल पॅथोलॉजी टेक्नोलॉजिस्ट हे दोघंही निष्कर्षावर समाधानी असतील, तर रिपोर्ट तयार केला जातो. 'वीज नको, राघव पाहिजे'; तरुणीच्या अजब मागणीवर आमदाराची प्रतिक्रिया व्हायरल पॅथोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट अलेक्जेंड्रियानं सांगितलं, की पोस्टमॉर्टम करून रिपोर्ट तयार केल्यानंतर सर्व भाग शरीरात पुन्हा ठेवले जातात. यानंतर स्वच्छ कपड्यामध्ये ठेवून हा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत तब्बल एक तास लागतो. मात्र, हे केसवर अवलंबून असतं. अलेक्जेंड्रियानं सांगितलं, की हे अजिबातही सोपं काम नाही. प्रत्येक वेळी अनेक अडचणी असतात. अनेकदा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत असतो. अशात शवविच्छेदन करणं आणखीच कठीण असतं. भावनिकरित्या पाहिल्यास आत्महत्या प्रकरणातील व्यक्तींचं शवविच्छेदन अतिशय वेदनादायी असतं, असंही तिनं म्हटलं. तिनं पुढे सांगितलं, की शवविच्छेदनासाठी अनेकदा किचनमधील सामानाचाही वापर केला जातो. यात टाके टाकण्यासाठी सुई आणि दोरा हे एक महत्त्वाचं साहित्य आहे. शवविच्छेदनासाठी लागणारं सामान अनेक वर्षे बदललं जात नाही. बाईक स्टंट करणं पडलं महागात; दुचाकीवरुन कोसळला तरुण अन्.., पाहा थरारक VIDEO अलेक्जेंड्रियानं सांगितलं, की या कामात तुम्ही घड्याळ पाहू शकत नाही. एका दिवसात सहा-सहा पोस्टमार्टम करावे लागतात. या कामासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या मजबूत राहावं लागतं. मात्र, तरीही माझं काम मला आवडतं, असं अलेक्जेंड्रियानं म्हटलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: