नवी दिल्ली 01 जुलै : ट्विटरवर अनेकदा यूजर्स (Twitter User) अशा कमेंट करतात की त्या कमेंटच अधिक व्हायरल (Viral Comments) होतात. असंच काहीसं दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत घडलं. वीज नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका महिला यूजरनं लिहिलं, की तिला वीज नको आहे, राघव चढ्ढा पाहिजे. यावर राघव यांनीही मजेशीर उत्तर दिलं. ते म्हणाले, की आम आदमी पार्टीच्या (AAP) जाहीरनाम्यात मी नाही, मात्र मोफत वीज आहे. या उत्तरावर लोकांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. VIDEO उधाणलेल्या पाण्यातून तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि… हे सगळं तेव्हा घडलं, जेव्हा किर्ती ठाकूर नावाच्या एका ट्विटर यूजरनं 29 जुलैला लिहिलं, की जेव्हा केव्हा घरी येईल तेव्हा वीज गेलेली असते. यावर गुरदीप गुरू नावाच्या एका व्यक्तीनं लिहिलं, की यावेळी तर ‘आप’ला मत दिलं आहे, चोवीस तास वीज असते, तेदेखील फ्री. याचं उत्तर देत किर्तीनं लिहिलं, की मला वीज नकोय, राघव पाहिजे. याचं उत्तर देत आमदारानं लिहिलं, की मी मॅनिफेस्टोमध्ये नाही, मात्र मोफत वीज आहे. तुम्ही केजरीवाल यांना मत द्या,तुम्हाला चोवीस तास मोफत वीज देण्याचं वचन मी देतो, असं ते म्हणाले. मात्र, मी स्वतःबाबत हा दावा करू शकत नाही. राघव यांनी ही संपूर्ण बातचीत आपल्या इन्स्टाग्रामवरही शेअर केली आहे.
I'm not on the manifesto, but free electricity is.
— Raghav Chadha (@raghav_chadha) July 31, 2021
Vote for Kejriwal and I promise you’ll get free electricty, 24x7. Can’t commit the same about myself though :) https://t.co/F0tqLLp1FL
विशेष बाब म्हणजे, याआधी 2019 मध्येही राघव आणि किर्ती यांच्यावर ट्विटरवर मजेशीर बातचीत झाली होती. त्यावेळी किर्तीनं राघवसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी राघवनं प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, की राज्यातील आर्थिक परिस्थिती पाहता, ही लग्नासाठी योग्य वेळ नाही. आपल्याला चांगल्या दिवसांची वाट पाहायला हवी. यावरही अनेक ट्विटर यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. ही पहिली वेळ नाही की राघव यांच्यासोबत असं काही घडलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्यावेळी राघव यांना लग्नाचे अनेक प्रस्ताव आले होते.