• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बाईक स्टंट करणं पडलं महागात; दुचाकीवरुन कोसळला तरुण अन्.., पाहा थरारक VIDEO

बाईक स्टंट करणं पडलं महागात; दुचाकीवरुन कोसळला तरुण अन्.., पाहा थरारक VIDEO

आजपर्यंत तुम्ही लोकांना अनेक स्टंट करताना (Bike Stunt Video) पाहिलं असेल. अनेकदा स्टंट करताना काही लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात

 • Share this:
  नवी दिल्ली 01 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. यातील काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. तर, काही व्हिडिओ हैराण करतात. काही व्हिडिओ तर असे असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. इतकंच नाही तर काही लोकं मुद्दाम विचित्र व्हिडिओ (Weird Videos) बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील (Viral Video) होतात. या व्हिडिओवर यूजर्स भरपूर कमेंटही करतात. असाच एक स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. VIDEO उधाणलेल्या पाण्यातून तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि... आजपर्यंत तुम्ही लोकांना अनेक स्टंट करताना (Bike Stunt Video) पाहिलं असेल. अनेकदा स्टंट करताना काही लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओदेखील असाच आहे. यात पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपली दुचाकी हायवेवर पळवत आहे. तो बाईकवर बसून नाही तर उभा राहून हे करत आहे. मात्र, पुढे जे काही घडतं, त्याची त्यानं कल्पनाही केली नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा हायवेवर आपली गाडी पळवत आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो गाडीवर बसलेला नाही तर उभा राहिलेला आहे आणि स्टंट करत आहे. इतक्यात अचानक त्याच्या बॅलन्स बिघडतो आणि तो खाली पडतो. मात्र, त्याची बाईक बरंच अंतर पुढे चालत राहते.
  VIDEO : सेल्फी घेताना तलावात दिसली हालचाल; पर्यटकांसमोरच तरुणाने तडफडत सोडला जीव हा व्हिडिओ mahichoudhary8570 नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. बहुतेकांचं असं म्हणणं आहे, की तरुणांनी अशाप्रकारचे स्टंट करून आपला जीव धोक्यात टाकणं चुकीचं आहे. असे स्टंट आणि हे स्टंट करणाऱ्या व्यक्तींपासून नेहमीच लांब राहायला हवं.
  Published by:Kiran Pharate
  First published: