नवी दिल्ली 01 जानेवारी : कल्पना करा की तुम्ही एका नावेत बसून समुद्रात फिऱण्याचा आनंद घेत आहात. अशात अचानक तुम्हाला व्हेल मासे समुद्रातील पाण्याच्या वर येऊन हवेत उडी घेताना दिसत आहेत. साहजिकच, हे पाहून तुम्ही खूप रोमांचित व्हाल. पण पुढच्याच क्षणी एका महाकाय व्हेल माशाने (Video of Whale) तुमच्या बोटीजवळ उडी मारली, तर तुमची काय अवस्था होईल? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
व्यक्तीचं दुःख पाहून श्वानाने त्याला मारली कडकडून मिठी; VIDEO पाहून व्हाल भावुक
व्हिडिओच्या सुरुवातीला समुद्राचं दृश्य पाहायला मिळतं. या दरम्यान काही व्हेल मासे पाण्यात दूरवर दिसतात. हे व्हेल मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येताना आणि हवेत झेप घेतानाही दिसतात. दरम्यान, काही पर्यटक बोटीत बसून याचा आनंद लुटत आहेत. हा सुंदर क्षण ते आपल्या कॅमेऱ्यात टिपू लागतात. पण मग असं काही घडतं, ज्याचा अंदाजही बोटीत बसलेल्या लोकांना नसेल. अचानक बोटीच्या शेजारीच एक महाकाय व्हेल मासा हवेत उडी घेतो. सुदैवाने हा मासा बोटीवर पडला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर oceanlife.4u नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओ दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, आपल्याला हसण्याची मोठी संधी मिळते, पण जर आपण या बोटीत बसलेलो असतो, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असती?
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं, हे जर माझ्यासोबत घडलं असतं तर माझी अवस्था वाईट झाली असती. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, ज्या पद्धतीने माशाने उडी घेतली आहे, हे पाहून असं वाटतं की तो लोकांनी आपल्या परिसरातून जाण्यास सांगत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Whale