Home /News /viral /

खरा मित्र! व्यक्तीचं दुःख पाहून श्वानाने मारली कडकडून मिठी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक

खरा मित्र! व्यक्तीचं दुःख पाहून श्वानाने मारली कडकडून मिठी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक

Emotional Video of Dog: व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रसत्याच्या कडेला बसला आहे. त्याच्या शेजारीच एक श्वान बसलेला आहे.

  नवी दिल्ली 01 जानेवारी : माणूस आणि श्वानाचं नातं (Friendship of Human and Dog) अतिशय खास असतं. मालक आणि श्वानाचे अनेक व्हिडिओही सतत सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते. प्राणी आणि माणसाचं हे नातं अतिशय अनोखं आणि प्रेमळ असतं. यांच्या मैत्रीचे अनेक असे किस्से असतात, जे मन जिंकून घेतात. हे व्हिडिओ सर्वांच्या चांगलेच पसंतीसही उतरतात. अनेकदा तर असं काही पाहायला मिळतं, की हे व्हिडिओ पाहून वाटतं की माणसाचा प्राण्यापेक्षा चांगला मित्र कोणीच नसेल. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. Shocking! थेट वाघाच्या जबड्यात तरुणाने दिला हात आणि...; थरकाप उडवणारा VIDEO सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रसत्याच्या कडेला बसला आहे. त्याच्या शेजारीच एक श्वान बसलेला आहे. व्हिडिओ पाहून समजतं की हा व्यक्ती बेघर आहे आणि तो अतिशय एकटा आहे. त्याचं आपलं असं कोणीच नाही. अशात श्वानाला समजतं की या व्यक्तीला प्रेम हवं आहे. यानंतर हा श्वान या व्यक्तीजवळ जावून त्याला लळा घालण्यास सुरुवात करतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत (Emotional Video of Dog). हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की तो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. सोबत लोक लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातूनही या व्हिडिओवर भरपूर प्रेम व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला गेला आहे. Buitengebieden नावाच्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, हा कुत्रा एका बेघर व्यक्तीच्या जवळ जातो आणि त्याला समजतं की या व्यक्तीला काय हवं आहे.

  आईच्या डोळ्यादेखत इमारतीवरून कोसळला चिमुकला लेक आणि...; धडकी भरवणारा VIDEO

  आतापर्यंत हा व्हिडिओ 6 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, खरंच हे प्राणी आपल्या मित्रांना कधीच विसरत नाहीत. तर आणखी एका यूजरने लिहिलं, अतिशय अनोखा आणि सुंदर व्हिडिओ आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Emotional, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या