Home /News /viral /

Shocking! थेट वाघाच्या जबड्यात तरुणाने दिला हात आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

Shocking! थेट वाघाच्या जबड्यात तरुणाने दिला हात आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

प्राणीसंग्रहालयात वाघाने तरुणावर केला खतरनाक हल्ला.

    वॉशिंग्टन, 31 डिसेंबर : वाघ (Tiger) म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो. एखाद्या प्राणीसंग्रहालयात, जंगल सफारीवर गेल्यानंतर समोर वाघ दिसताच भीतीने तोंडातून शब्दही फुटेनासे होतात. वाघासमोर उभं राहण्याची डेअरिंगही होत नाही. एका तरुणाने मात्र चक्क वाघाच्या जबड्यातच हात दिला. पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे (Tiger attack video). अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही धक्कादायक घटना आहे (Florida naples zoo tiger attack video). नेपल्स झूमधील एका कर्मचाऱ्याने स्वतःला मरण्यासाठी वाघाच्या स्वाधीन केलं. वाघासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याच्या तोंडात आपला हात दिला. रिव्हर रोजेनक्विस्ट असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 26 वर्षांचा रिव्हरने रात्रीच्या वेळी झूमध्ये गेला.  वाघ असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रा तो गेला. वाघ समोर येताच त्याने वायर फेन्सिंगमधून आपला हात आत टाकला. वाघाने त्याचा हातात आपल्या जबड्यात धरून खेचला. वाघाने त्याचा हात इतका करकचून तोंडात धरला की त्याला तीव्र वेदना होऊ लागला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. जीव द्यायला गेलेला रिव्हर आपल्या जी मदतीची याचना करू लागला. त्याच्या आवाज ऐकून काही पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला पोलिसांनी वाघाच्या तावडीतून तरुणाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ काही त्याचा हात सोडेना. वाघाने त्याचा हात तोंडात घट्ट धरला होता की तो सोडवणं अशत्य होतं. अखेर त्यांना नाइलाजास्तव वाघाला गोळी मारावी लागली. जेणेकरून कर्मचाऱ्याचा जीव वाचवता येईल, अशी माहिती झूच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आली आहे. हे वाचा - Shocking Video! सापासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; प्रायव्हेट पार्टला केला दंश रिपोर्टनुसार रिव्हरला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सुदैवाने त्याचा जीव जाता जाता वाचला आहे.
    First published:

    Tags: America, Tiger, Tiger attack, Viral, Viral videos, Zoo

    पुढील बातम्या