Home /News /viral /

प्रसिद्धीसाठी काहीही! नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्...

प्रसिद्धीसाठी काहीही! नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्...

एक तरुण नाल्याच्या काठावर असलेल्या सिमेंटच्या लेनवरुन चालत आहे. तर, दोन मुलं शेजारी असलेल्या या नाल्याच्या पाण्यात आहेत.

  नवी दिल्ली 03 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक चांगले फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अगदी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतात. अनेकदा त्यांचे हे प्लॅन यशस्वीदेखील होतात. मात्र, कधी कधी हे प्लॅन अपयशी ठरतात आणि भलतंच काहीतरी घडतं. सध्या सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ (Instagram Video) व्हायरल होत आहे. एका व्यक्तीच्या व्हिडिओ रेकॉर्डींगचा हा व्हिडिओ (Funny Video Viral) आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही आवरणार नाही आणि आश्चर्यही वाटेल. एका व्हिडिओसाठी या व्यक्तीला अत्यंत विचित्र कृत्य (Weird Video) करावं लागलं आहे. भूस्खलनामुळे घरं उद्धवस्त; 19 जण बेपत्ता, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO इन्स्टाग्रामवर Weird Vidz नावाच्या एका अकाऊंटवरुन हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला गेला आहे. काही लोकांना हा व्हिडिओ विचित्रही वाटू शकतो. यात पाहायला मिळतं की एक तरुण नाल्याच्या काठावर असलेल्या सिमेंटच्या लेनवरुन चालत आहे. तर, दोन मुलं शेजारी असलेल्या या नाल्याच्या पाण्यात आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by WEIRD Vidz (@weirdvidz)

  VIDEO : याची पण ट्रेन सुटली काय? वाघाला रेल्वे ट्रॅकवर पाहून सगळ्यांचीच हवा टाईट या नाल्यात झोपून एक व्यक्ती शेजारुन चालत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ शूट करत आहे. तर, दुसरा मुलगा व्हिडिओ शूट करणाऱ्या मुलाला नाल्यातून हळूहळू पुढे खेचत आहे. यामुळे त्यांना शूटसाठी परफेक्ट अँगल शोधण्यास मदत होत आहे. मात्र, या व्हिडिओला वेगळं वळण तेव्हा येत जेव्हा हे समजतं की या तरुणानं बॅक कॅमेऱ्याच्याजागी (Back Camera) फ्रंट कॅमेरा (Front Camera) सुरू केला आहे. यामुळे पाण्यात झोपलेल्या तरुणानं समोरच्याचा व्हिडिओ शूट करण्याऐवजी स्वतःचाच व्हिडिओ शूट केला. इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video viral

  पुढील बातम्या