जपान 03 जुलै : जपानची (Japan) राजधानी टोकियोच्या पश्चिमी अतामी शहरात (Atami city) भूस्खलनामुळे (Mudslide) अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. यात कमीत कमी 19 लोक बेपत्ता झाले (19 People Missing in Mudslide at Atami City) आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिझुओका प्रांतातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ही घटना शनिवारी सकाळी अतामी शहरात घडली. हे शहर गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी ओळखलं जातं. घटनेत किमान 19 लोक बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ताकामिची सुगीआमा म्हणाले, बचाव कामगार बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले, की इझूसन नावाच्या क्षेत्रात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. सुगीआमा म्हणाले, की अतिवृष्टीची शक्यता पाहता काही लोकांनी आधीच या परिसरातून दुसरीकडे स्थलांतर केलं होतं. परंतु याबाबत सध्या अधिक माहिती मिळू शकली नाही. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच जपानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. VIDEO: ‘कर्माचं फळ मिळालं’; लाथ मारणाऱ्या युवकाला झाडानं दिलं जोरदार प्रत्युत्तर टेलिव्हिजन फुटेजमध्ये, एक शक्तिशाली काळ्या रंगाचा चिखलाचा भलामोठा गोळा डोंगरावरून खाली येताना दिसतो. यादरम्यान, हा गोळा वाटेत असलेल्या घरांवरुन जात असून ही घरं नष्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिसरातील लोक डोळ्यासमोर स्वतःची घरं उद्ध्वस्त होत असल्याचं पाहत आहेत आणि ही धक्कादायक घटना कॅमेर्यामध्ये कैद करत आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच जपानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मध्य आणि टोकियो भागातील नद्यांना पूर आला आहे. यामुळेच भूस्खलनाचा धोका वाढला आहे.
助けて、どうしていいかわかんない pic.twitter.com/bod6nxeooT
— 中島茉子(コマツ屋製麺) (@522Kmkm) July 3, 2021
VIDEO : याची पण ट्रेन सुटली काय? वाघाला रेल्वे ट्रॅकवर पाहून सगळ्यांचीच हवा टाईट याआधी मागील वर्षी जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे जपानच्या दक्षिणी भागात पूर आला होता. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता तसंच भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या होत्या. रस्ते आणि घरांचंही यात मोठं नुकसान झालं होतं. या दुर्घटनेत कमीत कमी 58 लोकांनी आपला जीव गमावला होता.