मराठी बातम्या /बातम्या /Viral /

याची पण ट्रेन सुटली की काय? वाघाला रेल्वे ट्रॅकवर फिरताना पाहून सगळ्यांचीच हवा टाईट; पाहा VIDEO

याची पण ट्रेन सुटली की काय? वाघाला रेल्वे ट्रॅकवर फिरताना पाहून सगळ्यांचीच हवा टाईट; पाहा VIDEO

एक वाघ जंगलातून बाहेर पडून रेल्वे ट्रॅकवर फिरत आहे. या वाघाला रेल्वे ट्रॅकवर फिरताना पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 03 जुलै : रेल्वे स्टेशनवर (Railway Station) तुम्ही तुमची ट्रेन (Train) पकडण्यासाठी गेला आहात आणि अचानक समोर वाघ आला तर? सहाजिकच तुम्ही वाघाला (Tiger) पाहून पुरते घाबरुन जाल. मात्र, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Tiger) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे रुळावरच (Railway Track) वाघ फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. VIDEO: 'कर्माचं फळ मिळालं'; लाथ मारणाऱ्या युवकाला झाडानं दिलं जोरदार प्रत्युत्तर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळतं की एक वाघ जंगलातून बाहेर पडून रेल्वे ट्रॅकवर फिरत आहे. या वाघाला रेल्वे ट्रॅकवर फिरताना पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जिथे हा वाघ फिरत आहे त्याच्या आजूबाजूला लोकही असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर याठिकाणी गाड्याही उभा केल्या गेल्या आहेत. हे दृश्य पाहून लक्षात येतं की ही वर्दळीचीच जागा आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. कुत्र्याला बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग..; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की बहुतेक घर जाण्यासाठी निघालेला असताना त्याची ट्रेन सुटली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ केवळ शेअर करत नाहीयेत तर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरनं लिहिंल आहे, की लॉकडाऊन हटवल्यानंतर आपल्या मित्रांना भेटण्यासाठी तो कदाचित ट्रेननं कॉलेजला जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर काहींनी कमेंट करत म्हटलं, ' राज इथे आहे तर सिमरन कुठे आहे?'
First published:

Tags: Tiger, Viral videos

पुढील बातम्या