Home /News /viral /

लग्नाला यायचंय? मग आधी 3 लाख रुपये द्या, नवरीनं पाहुण्यांसमोर अट ठेवत दिली अजब धमकी

लग्नाला यायचंय? मग आधी 3 लाख रुपये द्या, नवरीनं पाहुण्यांसमोर अट ठेवत दिली अजब धमकी

हे कपल थायलंडला जाऊन डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding in Thailand) करणार आहे. यामुळे नवरीनं प्रत्येक पाहुण्याकडे 3 हजार पाउंडची मागणी केली आहे.

    नवी दिल्ली 25 सप्टेंबर : लग्नात (Marriage Function) येणारे पाहुणे हे नवरी आणि नवरदेवासाठी गिफ्ट घेऊन येत असतात (Gift for Bride and Groom) आणि यासाठी ते भरपूर पैसेही खर्च करत असतात. मात्र, एखाद्या नवरीनं लग्नात प्रवेश करण्यासाठीच पाहुण्यांकडे पैसे मागितले तर? ऐकून आश्चर्य वाटलं असेल मात्र एका नवरीनं खरंच असंच केलं. तिनं आपल्या लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडे 3 लाख रुपये मागितले. इतकंच नाही तर असं न केल्यास त्यांना आपल्या फेसबुक फ्रेंड लिस्टमधून (Facebook Friend List) काढून टाकण्याची धमकी दिली. काय सांगता! शिव्या देणारे लोक जगातात दीर्घायुष्य; संशोधनातून खुलासा हे कपल थायलंडला जाऊन डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding in Thailand) करणार आहे. यामुळे नवरीनं प्रत्येक पाहुण्याकडे 3 हजार पाउंडची मागणी केली आहे. नवरीनं म्हटलं, की जेव्हा आम्ही आमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना असं मिळून 150 जणांना निमंत्रण दिलं तेव्हा त्यातील फक्त 9 लोकांनीच त्यांना रिप्लाय दिला. नवरीनं म्हटलं, की मला यातून हे समजलं की आमच्या या खास दिवसाचा हिस्सा बनवण्यासाठी तुम्हाला 3 हजार पाउंड खूप जास्त वाटत आहेत. नवरीबाई एवढ्यावरच थांबली नाही तर केवळ 9 च पाहुण्यांनी पैसे देण्यास सहमती दर्शवल्यानं तिनं आपल्या लग्नाचं लोकेशन बदलून हवाई लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता फक्त सात पाहुणेच या कपलच्या लग्नात येण्यासाठी तयार आहेत. Yuck! इथे लघवीत उकडून आवडीनं खाल्ली जातात अंडी; सांगितलं अजब कारण नवरी पुढे म्हणाली, की आता मी इथून पळ काढण्यासाठी वाट बघत आहे आणि कोणालाही आमच्या या खास दिवसाचा हिस्सा होऊ देणार नाही. मित्रांनो तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा वेळ आहे. आताही तुम्ही रिप्लाय केला नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या फेसबुक लिस्टमधून हटवू, असं तिनं म्हटलं. नवरीचं हे वागणं पाहून सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की मी तर असा विचारही करू शकत नाही की लोकांनी मला लग्न करताना पाहण्यासाठी पैसे द्यायला हवेत. दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की त्यांचं लग्न पाहण्यासाठी इतका खर्च कऱण्यापेक्षा त्यांच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमधून बाहेर पडणंच योग्य आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bride, Wedding, Wedding couple

    पुढील बातम्या