बीजिंग 25 सप्टेंबर : जगभरात अनेक विचित्र गोष्टी (Weird Things) आहेत. मात्र, चीन (China) याबाबत सगळ्यात पुढे आहे. आता असंच आणखी एक प्रकरणी चीनमधून समोर आलं आहे. चीनच्या Zhejiang येथील डोंगयांग (Dongyang) शहरात लघवीमध्ये उकडून अंडी खाल्ली जातात (Eggs Boiled in Urine). यातही ही काळजी घेतली जाते, की ही लघवी दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचीच असावी. मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं, सुटकेसाठी तरुणीची धडपड; धडकी भरवणारा VIDEO डोंगयांगमध्ये स्ट्रीट वेंडर्स लघवीमध्ये अंडी उकडून यापासून खास डिश बनवतात. अंड्याच्या या पदार्थाचं नाव व्हर्जिन बॉय एग्ज (Virgin Boy Eggs Dish) असं आहे. इथले लोक अगदी आवडीनं ही अंडी खातात. लघवीत उकळलेल्या अंड्यांची विक्री इथे मोठ्या प्रमाणात होते. आता तुमच्या मनात असा सवाल उपस्थित झाला असेल की स्ट्रीट वेंडर्स लहान मुलांची लघवी आणतात कुठून. तर हे वेंडर्स शाळांमध्ये बादली ठेवतात आणि दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना यात लघवी करण्यास सांगितलं जातं. अशा पद्धतीनं मूत्र साठवलं जातं. मागील बऱ्याच काळापासून या शहरातील लोक लघवीत उकडलेली अंडी खातात. हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे, की ही अंडी खाल्ल्यानं हीट स्ट्रोक (Heat Stroke) होत नाही. हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे (Healthy Food). मॉडेलनं स्वतःशीच केला विवाह; या कारणामुळे घेतला मोठा निर्णय Virgin Boy Eggs ही डीश बनवण्यासाठी जवळपास एक पूर्ण दिवस लागतो. सगळ्यात आधी ही अंडी लघवीमध्ये जवळपास सहा ते सात तास ठेवली जातात. यानंतर ही अंडी लघवीतच उकडली जातात. यानंतर अंड्याचं बाहेरचं कवच फुटतं. यानंतर लघवीची वाफ देऊन ही अंडी शिजवली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.