• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • विचित्र प्रथा! इथे लग्नाआधी नवरीला करावं लागतं टक्कल; कारण वाचून व्हाल थक्क

विचित्र प्रथा! इथे लग्नाआधी नवरीला करावं लागतं टक्कल; कारण वाचून व्हाल थक्क

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

तुम्ही कधी अशा प्रथेबद्दल ऐकलंय का, ज्यात मुलीला लग्नाआधी आपले संपूर्ण केस कापावे लागतात?

 • Share this:
  नवी दिल्ली 20 सप्टेंबर : जगभरात लग्न (Marriage) हे एक पवित्र नातं मानलं जातं. वेगवेगळ्या भागात लोक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरांनुसार लग्न करतात. मात्र, तुम्ही कधी अशा प्रथेबद्दल ऐकलंय का, ज्यात मुलीला लग्नाआधी आपले संपूर्ण केस कापावे लागतात. मात्र, ही विचित्र प्रथा बोराना समाजात (Borana Tribe) आजही पाळली जाते. हा समुदाय साऊथ अफ्रिका (South Africa), इथोपिया आणि सोमालिया येथे राहतो. VIDEO: चिमुकली पाण्यात बुडत असल्याचं दिसताच मदतीला धावला कुत्रा; असा वाचवला जीव या समाजात महिलांपेक्षा पुरुषांना अधिक महत्त्व दिलं जातं. यात पुरुष गावातील जीवनशैली आणि प्राण्यांची पूर्ण काळजी घेतात, तर स्त्रिया घरं सजवणे आणि परंपरांचं पालन करणे अशा जबाबदाऱ्या सांभाळतात. हैराण करणारी बाब म्हणजे या समुदायातील मुलींना लग्नानंतरच त्यांचे केस वाढवण्याची परवानगी मिळते. इथल्या मुली चांगला नवरदेव मिळावा यासाठी लग्नाआधी टक्कल करतात. असं केल्यामुळे चांगला नवरा मिळतो, असा समज आहे. या समुदायातील लोक फोटो काढणंही टाळतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते असं त्यांचं म्हणणं आहे. तर, गावात सगळ्यात नशीबवान त्या मुलाला समजलं जातं, ज्याचे केस सर्वात लांब आहेत. असं केल्यानं ते मुलीसारखे दिसतात मात्र गावात त्यांना भरपूर सन्मान मिळतो. मॉडेलिंग सोडून निवडलं हे प्रोफेशन अन् पालटलं तरुणीचं नशीब; रातोरात झाली करोडपती डेली मेलच्या रिपोर्टनुसार, आता या लोकांच्या विचारात बदल होऊ लागला आहे. आता हे लोक शिक्षणालाही महत्त्व देत आहेत. या समाजात आता लोकांचे विचार काही प्रमाणात आधुनिक होऊ लागले आहेत. मुली गाव सोडून कामासाठी शहरात जाऊ लागल्या आहेत. जुन्या प्रथा बाजूला ठेवून हे लोक आता नवीन गोष्टी आणि विचार आमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही त्यांच्या काही परंपरा आजही लोकांना अवाक करणाऱ्या आहेत. हे लोक आपल्या जनावरांना घेऊन वेळोवेळी एका जागेहून दुसऱ्या जागी स्थलांतर करत असतात.
  Published by:Kiran Pharate
  First published: