Home /News /viral /

अजबच! मृत व्यक्तीच्या शरीराचा हा भाग तोडून घेतात कुटुंबीय; उद्देश जाणून व्हाल थक्क

अजबच! मृत व्यक्तीच्या शरीराचा हा भाग तोडून घेतात कुटुंबीय; उद्देश जाणून व्हाल थक्क

अंत्यसंस्काराआधी मृत व्यक्तीचे दात काढून घेतले जातात आणि यानंतर आयुष्यभर कुटुंबीय हे दात सांभाळून ठेवतात. ‘DeathTeethStory’ नावानं महिलेनं एक घटना शेअर केली आहे

    लंडन 18 सप्टेंबर : सध्या सोशल मीडिया साईट रेडिटवर (Reddit) एक अजब स्टोरी (Weird Story) व्हायरल (Viral News) होत आहे. ब्रिटिश वेबसाईटच्या वृत्तानुसार, यात अंत्यसंस्काराआधी मृत व्यक्तीचे दात काढून घेतले जातात आणि यानंतर आयुष्यभर कुटुंबीय हे दात सांभाळून ठेवतात. ‘DeathTeethStory’ नावानं महिलेनं एक घटना जगासोबत शेअर केली आहे. महिलेनं सांगितलं, की ती यूकेच्या वेल्समध्ये राहते आणि तिच्या सासरी मृत व्यक्तीचे दात तोडून स्वतःकडे ठेवण्याची अजब पद्धत आहे. Girlfriend साठी त्याने बनवले असे नियम, वाचून तुम्हालाही धक्का बसेल! वृत्तानुसार, हे तोडलेले दात मृताच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये वाटले जातात. जो व्यक्ती मृताच्या सर्वात जवळ असेल त्याला त्या पद्धतीनं दाताचं वाटप केलं जातं (Death Teeth Story). यासोबतच मृत व्यक्तीनं आयुष्यभर जितके दात साठवलेले असतात ते त्याच्या मृतदेहासोबतच दफन केले जातात. महिलेनं सांगितलं, की जेव्हा तिच्या पतीच्या आजीचा मृत्यू झाला तेव्हा सासूनं तिच्या हातात आजीचा दात दिला. जेव्हा महिलेनं हा दात आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला तेव्हा तिचा पती नाराज झाला. महिलेनं म्हटलं, की ती कोणाचाही दात आपल्याजवळ ठेवणार नाही आणि मरणानंतर आपलेही दात तोडले जाऊ नये, अशी इच्छा तिनं व्यक्त केली. महिलेनं सांगितलं, की तिचे सासरकडचे लोक खूप चांगले आहेत, मात्र ही प्रथा तिला अजिबातही आवडली नाही. महिलेला असं जाणवतंय की कदाचित तिचा पती तिला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे. धाडसीपणा नव्हे मूर्खपणा! भरधाव ट्रेनला लटकून खतरनाक स्टंट; धडकी भरवणारा VIDEO लोकांनी या महिलेच्या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत. एका यूजरं लिहिलं, की ही अतिशय अजब परंपरा आहे, तुझा पती तुला यासाठी घटस्फोट देण्याचा विचार करत आहे कारण तू स्वतःच्या मृतदेहाचे दात तोडण्यास परवानगी देत नाहीस. दुसऱ्यानं लिहिलं, वेडेपणाचा कळस आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, की हे अजब आहे. मात्र, यामुळे कोणालाही नुकसान होत नाही. तू यामागची कथा जाणून घ्यायला हवी.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dead body, Viral news

    पुढील बातम्या