मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धाडसीपणा नव्हे मूर्खपणा! भरधाव ट्रेनला लटकून खतरनाक स्टंट; धडकी भरवणारा VIDEO

धाडसीपणा नव्हे मूर्खपणा! भरधाव ट्रेनला लटकून खतरनाक स्टंट; धडकी भरवणारा VIDEO

चालत्या ट्रेनमध्ये तरुणाची नको ती 'हिरोगिरी'

चालत्या ट्रेनमध्ये तरुणाची नको ती 'हिरोगिरी'

चालत्या ट्रेनमध्ये तरुणाची नको ती 'हिरोगिरी'

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 17 सप्टेंबर : अनेकांना स्वतःच्याच जीवाशी खेळायला आवडतं. आपण मोठा पराक्रम करत आहोत, धाडसी आहोत असंच त्यांना वाटत असतं. असाच एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत (Viral video) आहे. ज्यात तरुण भरधाव ट्रेनला लटकून खतरनाक स्टंट करताना दिसतो आहे (Train stunt video). व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल (Danger stunt video). आजकाल अनेक तरुण स्वतःला हिरो समजतात. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही फिल्मी हिरोसारखी स्टाईल मारायला जातात. पण ही रिअल दुनियेत फिल्मी दुनियेप्रमाणे पुन्हा आयुष्य मिळत नाही, हे मात्र विसरतात. हा तरुणही त्यापैकीच एक. जो फक्त स्वतःच्या नाही तर स्वतःसह इतरांच्या जीवाशी खेळतो आहेत. त्याला जो पराक्रम वाटतो तो त्याच्या जीवासह इतरांच्याही जीवासाठी धोकादायक आहे. तो धाडसीपणा नव्हे तर मूर्खपणा आहे. व्हिडीओत पाहू शकता प्लॅटफॉर्मपासून हा तरुण हिरोगिरी दाखवायला सुरुवात करतो. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटून वेग धरताच त्यामध्ये चढतो, ट्रेनच्या दरवाज्याजवळी खांबाला पकडून प्लॅटफॉर्मवर पाय लांब करून घसरताना दिसतो. प्लॅटफॉर्म संपताच तो ट्रेनमध्ये चढतो. हे वाचा - नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा VIDEO त्यानंतरही तो थांबत नाही. तर एकेएक खतरनाक स्टंट करत जातो. कधी ट्रेनच्या दरवाज्याला वरच्या बाजूला फक्त चार बोटांनी धरून हवेत उडी मारतो. तर कधी खांबांना, झाडांना हात लावत जातो. मध्येच तर तो ट्रेनमधून पूर्ण बाहेर येतो आणि एका कट्ट्यावर ट्रेनच्या वेगासह धावतो आणि कट्टा संपताच पुन्हा आत जातो. यानंतर ट्रेनला लटकतो, पाय ट्रेनच्या खाली सोडून देतो. पुन्हा ट्रेनमध्ये जाऊन खाली बसतो आणि स्टंट करायला जातो. याचदरम्यान त्याचा तोल थोडा ढासळतानाही दिसतो. पण तो कसाबसा स्वतःला सावरतो. पण तरी त्याची हौस मिटलेली नाही. त्याचे स्टंट सुरूच असतात.  अगदी ट्रेनमध्ये चढण्यापासून ते पुढच्या प्लॅटफॉर्मपर्यंत हा तरुण असेच भयंकर करताना दिसतो. हे वाचा - संताप येईल, किळस वाटेल! क्रिस्पी टोस्ट आवडीने खात असाल तर हा VIDEO जरूर पाहा @InculoCazz ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कमेंटमध्ये एका युझरने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ तसा जुना आहे आणि यावर कारवाईही झाली आहे. व्हिडीओ जुना असला तरी अद्यापही काही लोक असं करतात. त्यामुळे कृपया तुम्ही असा मूर्खपणा बिलकुल करू नका.
First published:

Tags: Stunt video, Train, Viral, Viral videos

पुढील बातम्या