• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • Girlfriend साठी त्याने बनवले असे नियम, वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

Girlfriend साठी त्याने बनवले असे नियम, वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

तुमचा जोडीदार तुमच्यावर हक्क गाजवणारा (Controlling partner) असेल, तर ती रिलेशनशिप एखाद्या शिक्षेप्रमाणेच वाटू लागते. अमेरिकेतल्या एका कॉलेजवयीन तरुणीसोबतही (America girlfriend viral slambook) असाच प्रकार घडला आहे.

  • Share this:
मुंबई, 18 सप्टेंबर : रिलेशनशिपमध्ये असताना आपल्याला जोडीदाराने जखडून ठेवलेलं कोणालाच आवडणार नाही. त्यातच तुमचा जोडीदार तुमच्यावर हक्क गाजवणारा (Controlling partner) असेल, तर ती रिलेशनशिप एखाद्या शिक्षेप्रमाणेच वाटू लागते. अमेरिकेतल्या एका कॉलेजवयीन तरुणीसोबतही (America girlfriend viral slambook) असाच प्रकार घडला आहे. तिच्या बॉयफ्रेंडने रिलेशनशिपमध्ये असताना तिने पाळायचे असे काही नियम (controlling boyfriend rule book) सांगितले आहेत, जे ऐकून तिलाच काय तर तुम्हालाही चक्कर येईल. कॅरोलिन (Carolyn tiktok) नावाच्या या मुलीने टिकटॉकवर आपल्या बॉयफ्रेंडच्या स्लॅमबुकचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तिने सांगितलं, की दररोज युनिव्हर्सिटीमध्ये (tik tok viral rule book) तिला आपल्या बॉयफ्रेंडने घालून दिलेल्या या नियमांचं पालन करावं लागतं. असं केलं नाही, तर त्यांचं नातं टिकणार नाही, असं तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं आहे. हे नियम अगदीच त्रासदायक असल्याचं या मुलीने म्हटलं आहे. तुम्हीही पाहा काय आहेत हे नियम  कॅरोलिनने आपल्या बॉयफ्रेंडचं (Bizarre rule book for girlfriend) वागणं खूपच त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. या नात्यामध्ये आपली गळचेपीच अधिक होत असल्याचं तिने सांगितलं. या रुलबुकनुसार, कॅरोलिनने आपल्या मोबाइलमध्ये स्नॅप लोकेशन आणि माय फोन हे अॅप्स डाउनलोड करायचे आहेत. तसंच, कोणतेही कपडे घालण्यापूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडची आणि त्याच्या आईची परवानगी घेणं आवश्यक आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, तर पुढील नियम (Rules for girlfriend) अधिकच विचित्र आहेत. कॅरोलिनचा बॉयफ्रेंड म्हणतो, की तिने आपल्या आसपास 25 फूट परिघामध्ये येणाऱ्या कोणत्याही मुलासोबत बोलायचं नाही. तसंच विद्यापीठात क्रॉप टॉप आणि टाइट कपडे वापरायचे नाहीत. तिने कोणत्याही पार्टीमध्ये जायचं नाही, असाही नियम यात दिला आहे. यासोबतच, त्यांच्या ‘प्रेमाचं’ प्रतीक असलेली, बॉयफ्रेंडने दिलेली अंगठीही कधी काढायची नाही असाही नियम त्याने केला आहे. यासोबतच, असे अनेक नियम त्याच्या या बुकमध्ये दिले आहेत. कॅरोलिनच्या या टिकटॉकला (Tiktok viral rule book) आतापर्यंत 3.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तिला फॉलो करणाऱ्यांनी तिला शक्य तितक्या लवकर हे रिलेशनशिप थांबवण्याचा सल्ला दिला आहे. कॅरोलिननेही स्पष्ट केलं, की ही नियमावली वाचून तिला हसू आवरलं नाही. तिने तिथेच हे रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला. यावर लोकांनीही तिने योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. एका युझरने केलेल्या कमेंटनुसार, हा सर्व प्रकार मस्करीचा होता; मात्र हे जर खरं असेल, तर कॅरोलिनच्या या ‘एक्स’ला आयुष्यात कधीही गर्लफ्रेंड मिळणार नाही असंच दिसतंय.
First published: