• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : आणखी एक अजब पदार्थ आला समोर; ब्राउनी पान बनवण्याची विचित्र पद्धत पाहूनच वैतागले लोक

VIDEO : आणखी एक अजब पदार्थ आला समोर; ब्राउनी पान बनवण्याची विचित्र पद्धत पाहूनच वैतागले लोक

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खास पद्धतीनं पान बनवत आहे (brownie paan viral Video). हे पान इतकं विचित्र पद्धतीनं बनवलं जात आहे की पाहणाऱ्यांनाही उलटी येत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : जगभरात अनेक लोक असे असतात ज्यांना वेगवेगळ्या डिश बनवण्याचा छंद असतो. ते खाण्याच्या पदार्थांवर वेगवेगळे प्रयोग करत राहतात आणि याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करतात. मागील काही दिवसांपासून अशा अनेक विचित्र प्रयोगांचे व्हिडिओ व्हायरल (Weird Dishes Experiment Viral Video) होत आहेत. अशात आता आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खास पद्धतीनं पान बनवत आहे (Brownie Paan Viral Video). हे पान इतकं विचित्र पद्धतीनं बनवलं जात आहे की पाहणाऱ्यांनाही उलटी येत आहे. VIDEO : पंगा घेणं दिराला पडलं महागात; नवरीनं शिकवला असा धडा की झाला अवाक ट्विटर यूजर रमननं नुकतंच याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खाण्याचं पान बनवत आहे मात्र हे पान इतर पानांपेक्षा अगदीच वेगळं आहे. कारण हे ब्राउनी पान आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की हा व्यक्ती आधी एक गरम भांड्यात चॉकलेट टाकतो आणि मग त्यावर मोठं ब्राउनी पान ठेवतो. ब्राउनीवर आईस्क्रीन टाकल्याने लोकांना वाटतं की तो आईस्क्रीम आणि ब्राउनी मिसळून काहीतरी बनवत आहे. मात्र इतक्यात तो आईस्क्रीमवर पान ठेवतो. हे ब्राउनी पान अहमदाबादमध्ये बनवलं गेलं आहे (Ahmedabad Brownie paan). जे पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून १ लाखहून अधिकांना पाहिला आहे. ट्विटरवर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी हा व्हिडिओ पाहून सवाल केला की पान तव्यावर कोण बनवतं. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विटदेखील केला आहे. लग्नात वेगळं दिसण्यासाठी नवरदेवाने केलं विचित्र काम;थेट मृत्यूच्या दारात पोहोचला काही दिवसांपूर्वीच ओरिया मॅगी आणि मॅगी आईस्क्रीमसारखे फूड कॉम्बिनेशनही इंटरनेटवर व्हायरल झाले होते. हे पाहूनही लोक भ़डकले होते. एका व्यक्तीनं तर कोल्डड्रींकमध्ये पिझ्झा बुडवून खाल्ला होता. आता यानंतर ओरिओ भजीही (Oreo pakoda Video) चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे भजी बेसनपीठ आणि ओरिओ बिस्कीटाचा वापर करून बनवण्यात आले आहेत. जे पाहूनच लोकांनी उलटी येत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: