मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नात वेगळं दिसण्याच्या हौसेपोटी नवरदेवाने केलं विचित्र काम; थेट मृत्यूच्या दारातच पोहोचला

लग्नात वेगळं दिसण्याच्या हौसेपोटी नवरदेवाने केलं विचित्र काम; थेट मृत्यूच्या दारातच पोहोचला

शरीराने अतिशय किरकोळ असणाऱ्या या नवरदेवाला अशी चिंता होती की लग्नात त्याचे फोटो चांगले येणार नाहीत. यामुळे लग्नाच्या आधीच त्याने जिम जॉईन करून बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : लग्नात (Marriage) इतरांपेक्षा आपण वेगळं दिसावं अशी प्रत्येक नवरदेवाची इच्छा असते. अशाच एकानं नवरदेवानं लग्नाच्या काही दिवस आधी बॉडी बनवण्यासाठी जिम जॉईन केली (Groom Joined Gym Before Marriage). मात्र, तिथे त्याच्यासोबत जी घटना घडली, ती तो कधीच विसरणार नाही. चीनच्या Shenzhen इथे राहणाऱ्या Ahuan याचं वय 25 वर्ष आहे.

Ahuan च्या लग्नाची तारीखही ठरली होती. शरीराने अतिशय किरकोळ असणाऱ्या या नवरदेवाला अशी चिंता होती की लग्नात त्याचे फोटो चांगले येणार नाहीत. यामुळे लग्नाच्या आधीच त्याने जिम जॉईन करून बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला.

GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश

ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, लवकर मसल्स बनवण्यासाठी त्याने जिममध्ये एक पर्सनल ट्रेनर हायर केला. त्यानं Ahuan ला स्टेरॉईडचा डोस देण्यासोबतच भरपूर वजनाचे ब्रेंच प्रेस आणि दुसरे व्यायाम करण्यास सांगितले. काही दिवसांच्या व्यायामानंतर एक दिवस जेव्हा हा युवक जिममधून बाहेर निघाला तेव्हा त्याची अवस्था अचानकच खराब झाली. त्याला सतत उल्टी होत होती आणि चक्करही येत होती.

जिममध्ये असलेल्या एका जोडीदाराने लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे समजलं की वार्मअप न करता सतत अवघड व्यायाम केल्याने त्याच्या मसल्सवर जोर पडला. यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke Due to Gym) झाला. त्याची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी लगेचच सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. अनेक तासांच्या सर्जरीनंतर त्याचा जीव वाचला.

Girl’s College बाहेर तरुणाची हिरोगिरी, बेडूक स्टाईलने मारले PUSH UPS, पाहा VIDEO

या घटनेमुळे हा तरुण जवळपास 14 दिवस रुग्णालयातच राहिला. यामुळे त्याच्या लग्नाची तारीखही पुढे ढकलावी लागली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिन्यांनी त्यानं लग्नगाठ बांधली. यादरम्यान लग्नात त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी बॉडी बनवण्यावरुन त्याची मस्करी केली मात्र तो हसत राहिला.

First published:

Tags: Bridegroom, Shocking news