• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अजबच! नवरीचं विचित्र वागणं पाहून सासऱ्याला लग्नातच हृदविकाराचा झटका; तरीही सुरू राहिला कार्यक्रम

अजबच! नवरीचं विचित्र वागणं पाहून सासऱ्याला लग्नातच हृदविकाराचा झटका; तरीही सुरू राहिला कार्यक्रम

आता एका अशा नवरीची (Bride) चर्चा रंगली आहे जिनं लग्नाच्या पार्टीत (Wedding Party) आपल्या सासू अन् सासऱ्यांकडेच दुर्लक्ष केलं.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : प्रत्येकासाठी आपल्या लग्नाचा दिवस (Wedding Day) अतिशय खास असतो. हा दिवस आणखी अविस्मरणीय बनावा यासाठी पाण्याप्रमाणे पैसा ओतला जातो. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या लग्नात कोणीही नाराज राहू नये. मात्र, आता एका अशा नवरीची (Bride) चर्चा रंगली आहे जिनं लग्नाच्या पार्टीत (Wedding Party) आपल्या सासू अन् सासऱ्यांकडेच दुर्लक्ष केलं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म रेडिटवर (Online Platform Reddit) या नवरीबाईचा कारनामा सांगितला गेला आहे. तिनं आपल्या लग्नात केवळ काही पाहुण्यांच्या जेवणाचीच व्यवस्था केली होती. यातही तिनं पैसे वाचवण्यासाठी पाहुण्यांचंही पोट भरेल एवढं जेवण दिलेलं नव्हतं, त्यामुळे लग्नात उपस्थित सगळेच लोक भडकले. लग्नात अनेक गोष्टी विचित्रच होत्या, मात्र नवरीनं पाहुण्यांसाठी फ्री बारची व्यवस्था केली होती. ...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य मुलाचं लग्न हे प्रत्येक आई-वडिलांसाठी खास असतं. मात्र, या नवरीबाईमुळे नवरदेवाच्या आई-वडिलांसाठीही हा सर्वात वाईट दिवस ठरला. नवरदेवाच्या आईनं आपल्या मुलाच्या लग्नाच्या पार्टीसाठी 10 हजार पाऊंड खर्च केले होते. मात्र, नवरीनं त्यांनी आमंत्रणच दिलं नाही. इतकंच नाही तर नवरदेवाच्या वडिलांना लग्नादरम्यानच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तरीही नवरीनं ही पार्टी थांबवली नाही. एखाद्या पाहुण्यानं यादरम्यान तिच्या सासऱ्याची चौकशी केली तर ती नाराज व्हायची. हा शक्तिमानच! लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का? बहुतेक लग्नांमध्ये खाण्या-पिण्याची अगदी उत्तम व्यवस्था असते. मात्र, या लग्नात पाहुणे भुकेनं व्याकुळ झाले होते. मात्र, नवरीनं प्रत्येकाला अतिशय कमी प्रमाणात जेवण देण्याचं सांगितलं होतं. त्यामुळे, पाहुणेही त्रस्त झाले. जेव्हा लोकांनी या अजब लग्नाची गोष्ट सोशल मीडियावर वाचली तेव्हा आश्चर्य व्यक्त केलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: