ब्रिटन, 22 सप्टेंबर : अनेकदा लाइव्ह रिपोर्टिंग (Live reporting) करताना रिपोर्टरसोबत असं काही घडतं की ज्यामुळे फक्त आपणच आणि तर रिपोर्टरही शॉक होतो. सध्याच अशाच एक लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ व्हायरल (Live reporting video viral) होतो आहे. ज्यात एक रिपोर्टर कुत्र्याला घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग (Reporting with dog) करत होती. त्यावेळी तिच्या कुत्र्याने तिच्यासोबत जे काही केलं ते खूप शॉकिंग होतं. ते संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं (Shocking incidence with reporter during live).
महिला रिपोर्टर एका कुत्र्याला सोबत घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. सुरुवातीला बराच वेळ कुत्रा तिच्या बाजूला बसलेला आहे. त्याचवेळी ती रिपोर्टर हसत हसत लाईव्ह देते आहे. स्टुडिओतील अँकरशी संवाद साधताना दिसते आहे. त्याचवेळी कुत्रा तिच्यासोबत जे काही काही करतो ते पाहून आपल्याला सुरुवातीला धक्काच बसतो.
व्हिडीओत पाहू शकता, या रिपोर्टरच्या शेजारी बसलेला कुत्रा थोड्या वेळाने तिथून पळ काढतो. तो समोर कॅमेरमनच्या दिशेने पळत जातो. पण त्याच्या गळ्यातील दोरी रिपोर्टरच्या हातात आहे. रिपोर्टर लाइव्ह देण्यात दंग आहे, त्याचवेळी कुत्रा तिला आपल्यासोब खेचतच घेऊन जातो.
हे वाचा - हा शक्तिमानच! लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का?
रिपोर्टर अक्षरशः जमिनीवर आडवीच पडते. ती स्वतःला सावरू शकत नाही. थोड्या वेळाने ती पुन्हा उठते आणि स्क्रिनसमोर येते.
व्हिडीओ पाहून जसा आपल्याला धक्का बसला तसाच अँकरलाही बसला. त्यामुळे रिपोर्टर पुन्हा स्क्रिनसमोर येताच अँकर तिला तू ठीक आहे ना, तुला दुखापत झाली नाही ना, असं विचारतो. त्यावेळी रिपोर्टर बिलकुल नाही असं उत्तर देतं. मग रिपोर्टर आणि अँकर दोघेही हसतात. कुत्र्याला कॅमेरामन जास्त आवडल्याचं दिसतं अशी प्रतिक्रियाही अँकर देतो.
हे वाचा - अरे बापरे! हे काय? LIVE REPORTING वेळी मागे वळून पाहताच घाबरला पत्रकार; कॅमेऱ्यासमोरून पळाला
गाईड डॉग युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. इथं दिलेल्या माहितीनुसार या रिपोर्टरचं नाव कॅरोल किर्कवूड (Carol Kirkwood) आहे. ती बीबीसीमध्ये वेदर रिपोर्टसाठी काम करते. एका फ्लॉवर शोसाठी ती कुत्र्यासोबत बसून लाइव्ह करत होती. यूकेतील चेलसीमधील लाईव्ह टीव्हीवर अँकरशी संवाद साधत होती. त्याचवेळी ही घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reporter, Shocking viral video, Viral, Viral videos