Home /News /viral /

वैमानिक बॉयफ्रेंडनं फ्लाईटमध्येच केलं असं काही की लाजली प्रेयसी; विचित्र घटनेची रंगली चर्चा

वैमानिक बॉयफ्रेंडनं फ्लाईटमध्येच केलं असं काही की लाजली प्रेयसी; विचित्र घटनेची रंगली चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ फ्लाईटमध्ये शूट केला गेला आहे. यात वैमानिक विमानातच अजब अनाउन्समेंट करताना दिसत आहे.

    नवी दिल्ली 12 सप्टेंबर : जगात असे अनेक लोक असतात जे कोणाच्या तरी प्रेमात (Love) आकंठ बुडालेले असतात आणि आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ते नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. सध्या इंटरनेटवर एक टिकटॉक व्हिडिओ (Tiktok Video) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल (Viral Video) झाला आहे की आतापर्यंत करोडो लोकांनी तो पाहिला आहे. एका वैमानिक असल्यानं बॉयफ्रेंडनं आपल्या प्रेयसीसाठी विमानातच अजब अनाउन्समेंट (Weird Announcement in Flight) केली. भल्यामोठ्या किंग कोब्रानं सापाला जिवंतच गिळलं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ फ्लाईटमध्ये शूट केला गेला आहे. यात वैमानिक विमानातच अजब अनाउन्समेंट करता दिसत आहे. वैमानिकानं म्हटलं, की आपल्यासोबत या विमानात एक अत्यंत खास व्यक्ती प्रवास करत आहे. ती माझी गर्लफ्रेंड आहे. तिचं नाव हैना आहे आणि ती सीट नंबर 2C वर बसली आहे. जेव्हा तुम्हा लोकांचा प्रवास पूर्ण होईल तेव्हा कृपया माझं एक काम नक्की करा. 'तिला लवकर घेऊन जा नाहीतर...'; पाठवणीवेळीच मेहुणीची दाजीला अजब धमकी, VIDEO VIRAL पुढे हा वैमानिक म्हणाला, की विमानातून उतरताना माझ्या गर्लफ्रेंडला फिस्ट बम्प, हाय फाइव, स्नॅक्स किंवा पाण्याची बाटली नक्की देऊन जा. आमच्यासोबत प्रवास करण्यासाठी आणि प्रवासात मास्क वापरल्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच टेक ऑफ करणार आहोत. ही अनाउन्समेंट ऐकून गर्लफ्रेंडही लाजली. प्रेयसी जरीही ब्रायफ्रेंडची प्रपोजची अजब पद्धत (Weird Proposal) पाहून लाजली असली तरी तिच्या वडिलांना तरुणाचा हा अंदाज भलताच आवडल्याची चर्चा आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Viral news

    पुढील बातम्या