मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भल्यामोठ्या किंग कोब्रानं सापाला जिवंतच गिळलं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

भल्यामोठ्या किंग कोब्रानं सापाला जिवंतच गिळलं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की एक किंग कोब्रा (King Cobra) सापानं आपल्या तोंडात दुसऱ्या जिवंत सापाला पकडलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : किंग कोब्रा (King Cobra) हा जगातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक मानला जातो. तुम्ही किंग कोब्रा माणसाला चावल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र, कधी तुम्ही कोब्रानं दुसऱ्या सापाची शिकार केल्याचं पाहिलंय का? जर पाहिलं नसेल तर सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of King Cobra) होत आहे. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही हैराण व्हाल (Shocking Video).

क्रिकेटच्या मैदानात कुत्र्याची एन्ट्री, बॉल तोंडात घेऊन सर्वांना पळवले! VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक किंग कोब्रा सापानं आपल्या तोंडात दुसऱ्या जिवंत सापाला पकडलं आहे. हे पाहून असं जाणवतं, की कोब्रा या सापाची अत्यंत क्रूरपणे शिकार करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरा साप स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागताच किंग कोब्रा जोरात या सापाला जमिनीवर आपटतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

" isDesktop="true" id="603819" >

पुलावर स्टंट करणं भोवलं; अचानक तोल गेल्यानं गाडीसह धाडकन कोसळला तरुण, VIDEO

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, की माझी अवस्था तर या सापाला पाहूनच खराब झाली. दुसऱ्या एकानं लिहिलं, की या सापाचा आवाज एखाद्या हॉरर चित्रपटाप्रमाणे वाटत आहे. तर एकानं यावर मजेशीर कमेंट करत म्हटलं, की माझी पत्नीदेखील झोपल्यावर असेच आवाज करते. हा हैराण करणारा व्हिडिओ यूट्यूबवर Diaz Borneo नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 15 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: King cobra, Snake video, Viral news