मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'तिला लवकर घेऊन जा नाहीतर...'; पाठवणीवेळीच मेहुणीची दाजीला अजब धमकी, VIDEO VIRAL

'तिला लवकर घेऊन जा नाहीतर...'; पाठवणीवेळीच मेहुणीची दाजीला अजब धमकी, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. या व्हिडिओमध्ये नवरीच्या बहिणीनं असं काही केलं जे सगळ्यांचंच मन जिंकणारं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज लग्नातील अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Wedding Videos) होत असतात. लग्नातील व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीच्या पाठवणीचा व्हिडिओ व्हायरल (Bride Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. या व्हिडिओमध्ये नवरीच्या बहिणीनं असं काही केलं जे सगळ्यांचंच मन जिंकणारं आहे. पाठवणीवेळी नवरीची बहीण नवरदेवाला धमकी देताना दिसते.

सोफ्यावर बसून गप्पा मारत होत्या दोघी; अचानकच साप आला अन्..., घटनेचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र नवरीच्या पाठवणीचा हा व्हिडिओ खास आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव कारमध्ये बसलेले दिसत आहेत. आसपास मुलीच्या माहेरचे लोक उभा आहेत. यादरम्यान नवरी तिथे उभा असलेल्या सर्व पाहुण्यांचा निरोप घेऊन निघायची तयारी करते. इतक्यात नवरीची लहान बहीण येऊन नवरदेवाला धमकी देते. मात्र, ही धमकी अत्यंत क्यूट आहे. बहीण आपल्या दाजीकडे पाहून म्हणते, की तिला लवकर घेऊन जा नाहीतर इथेच थांबवेल. हे ऐकताच नवरदेव लगेचच आपली कार सुरू करून नवरीला घेऊन तिथून निघतो.

लोकल येणार तितक्या महिला रुळावर येऊन थांबली, वसई रेल्वे स्थानकावरचा LIVE VIDEO

इन्स्टाग्रामवर Dulhaniyaa नावाच्या अकाऊंटवरुन पाठवणीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यूजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, किती क्यूट आहेत ना या बहिणी. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 14 हजारहून अधिकांनी पाहिला होता. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. सर्वच या बहिणींच्या प्रेमाचं कौतुक करत आहेत. Dulhaniyaa या अकाऊंटवर लग्नातील व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ इमोशनल तर काही अतिशय मजेशीर असतात.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video