नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्न आणि नवरदेव नवरीचे वेगवेगळे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Bride and Groom) होत असतात. नवरी आणि नवरदेवाच्या व्हिडिओला नेटकऱ्यांचीही विशेष पसंती मिळते. याच कारणामुळे असा काही कंटेट शेअर करताच तो लगेचच व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडिओ (Groom Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल.
फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ
लग्नाच्या कार्यक्रमात तुम्ही बहुतेकदा नवरी आणि नवरदेवाला हसताना किंवा आनंदातच पाहिलं असेल. मात्र, अनेकदा स्टेजवरच कधी कधी नवरी तर कधी नवरदेव रागात असल्याचं दिसतं. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे.
View this post on Instagram
व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Wedding Video) वरमाळेच्या कार्यक्रमावेळी शूट केला असल्याचं जाणवतं. व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा असल्याचं दिसतं. नवरदेवाचे हावभाव बघून जाणवतं की तो कोणत्या तरी गोष्टीवरुन रुसला आहे. नवरी त्याला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, मात्र नवरदेव नखरे दाखवतच राहतो.
तुम्ही पाहू शकता, की नवरी स्टेजवर नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. मात्र, नवरदेव मिठाई खात नाही. तो वारंवार आपलं तोंड इकडे तिकडे फिरवत राहतो. या दरम्यान नवरीचे हावभाव पाहून समजतं की तिला नक्की काय वाटतंय. हा व्हिडिओ पाहून कोणीही नवरदेवाच्या या कृत्यामुळे नाराज होईल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
घरात घुसलं 12 फुटी अजगर, तरुणाने दाखवली हिंमत आणि.... पाहा VIDEO
काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ekmohabbataisibhi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ 13 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, याचं जबरदस्तीनं लग्न होत आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, बहुतेक तो गुटखा खातोय, त्यामुळेच तोंड उघडू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video