• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

इंडिगोमधील (Indigo) एअर हॉस्टेसचा KiDi च्या Touch It या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांचं भरपूर मनोरंजन करतात. तुम्हीही सतत सोशल मीडियावर सक्रीय राहत असाल तर तुम्ही फ्लाईटमध्ये सिंहल गाणं माणिके मंगे हितेवर डान्स करणाऱ्या एअर होस्टेसचा व्हिडिओ (Dance Video of Air Hostess) नक्कीच पाहिला असेल. आता इंडिगोमधील (Indigo) एअर होस्टेसचा KiDi च्या Touch It या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बॉलिवूड कलाकारांपासून (Bollywood Celebrities) सोशल मीडिया यूजर्सपर्यंत सर्वच या व्हायरल गाण्यावर थिरकत आहेत. बापरे! इवल्याशा चिमुकल्याचा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अचंबित या व्हिडिओ आतापर्यंत 550K हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ एअर होस्टेसनं आपल्या वृष पेस्टल नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला होता, मात्र नंतर हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला. व्हिडिओमध्ये एअर होस्टेस रिकाम्या फ्लाईटमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिच्याच एका सहकाऱ्यानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
  हवाई सुंदरीचे हावभाव आणि डान्स मूव्ह सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, 'शांत राहा'. ही एअर होस्टेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर भरपूर सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. या माध्यमातून ती सतत आपल्या फॉलोअर्सच्या संपर्कात राहते. पायऱ्यांवरून पडू लागलं बाळ; झेप घेत मांजरानं वाचला चिमुकल्याचा जीव, VIDEO VIRAL याआधी तिनं आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. यात ती सोशल मीडियावर ट्रेंड होणारं गाणं सिंपल सिंपलवर डान्स करताना दिसत होती. यात व्हिडिओमध्ये आधी ती सीटवर बसून एक्सप्रेशन देताना दिसली आणि नंतर संपूर्ण फ्लाईटमध्ये फिरताना दिसली. तिचा हा व्हिडिओदेखील नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: