लंडन 02 ऑक्टोबर : लग्नात (Marriage) जेवणासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. मात्र, ब्रिटनमधील एका कपलनं (British Couple) आपल्याच लग्नातील खर्च पाहुण्यांकडून वसूल केला. इतकंच नाही तर वेडिंग केक (Wedding Cake) जास्त खाणाऱ्या लोकांनाही मेसेज पाठवून पैसे मागितले गेले. सोशल मीडियावर (Social Media) हे कपल कंजूस म्हणून प्रसिद्ध झालं आहे. कपलच्या या विचित्र वागण्याचा खुलासा एका पाहुण्यानं केला, या पाहुण्याला पैसे मागणारा मेसेज आला होता.
VIDEO: ट्रकमधून कोसळू लागला युवक; इतक्यात कार चालकानं जे केलं ते मन जिंकणारं
मिररच्या रिपोर्टनुसार, लग्नात सहभागी झालेल्या एका पाहुण्यानं कपलच्या या कारनाम्याचा किस्सा Reddit वर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी तो मेसेजही शेअर केला आहे, जो त्यांना पाठवण्यात आला. मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे, की तुम्ही केकचे एकच्या ऐवजी दोन पिस खाल्ले आहेत. त्यामुळे तुम्हाला 3.66 पाउंड (जवळपास 370 रुपये) भरावे लागतील.
या कपलनं घोषणा केली होती, की लग्नात सहभागी होणारे पाहुणेच वेडिंग केक घेऊन येतील. यानुसार, पाहुण्यांनी पैसे जमा केले आणि केक आणला. यानंतर सगळ्यांनी केक खाल्ला आणि आनंदात आपल्या घरी गेले. काही दिवसांनंतर कपलनं गेस्टला एक मेसेज पाठवला. यात लिहिलं होतं, की सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आम्हाला समजलं,की तुम्ही एक पिसपेक्षा जास्त केक खाल्ला होता. त्यामुळे तुम्हाला 3.66 पाउंड आम्हाला भरपाई म्हणून द्यावे लागतील.
सरप्राईज देण्यासाठी गेलेल्या तरुणीला बसला धक्का; 3 मुलींसोबत या अवस्थेत आढळला BF
गेस्टनं म्हटलं, की कपलनं प्रती पिसनुसार हिशोब करून पैसे चार्ज केले, हे अतिशय धक्कादायक होतं. लग्नात कोणाला लक्षात राहातं की आपण काय खाल्लं. मला हे आठवत नाहीये की मी दुसरा पीस पण खाल्ला होता. सोशल मीडियावर या जोडप्यावर अनेकांनी टीका केली आहे. एका यूजरनं म्हटलं, की पाहुण्यांसाठी केक विकत घ्यायची पण लायकी नव्हती तर केक कापलाच कशाला? दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की कंजूसपणाचीही हद्द असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wedding cake, Wedding couple, Wedding video