Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सरप्राईज देण्यासाठी परदेशात गेलेल्या तरुणीला बॉयफ्रेंडकडूनच मिळालं सरप्राईज; 3 मुलींसोबत आढळला या अवस्थेत

सरप्राईज देण्यासाठी परदेशात गेलेल्या तरुणीला बॉयफ्रेंडकडूनच मिळालं सरप्राईज; 3 मुलींसोबत आढळला या अवस्थेत

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका मुलीनं आपल्या लॉन्ग डिस्टन्स बॉयफ्रेंडला दिलेल्या सरप्राईजचे फोटो व्हायरल होत आहेत. ही तरुणी बऱ्याच दिवसांनंतर आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी लांबून आली होती

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : प्रेमात लोकांना आपल्या पार्टनरसोबत (Couple Goals) अधिक वेळ घालवायला आवडतं. मात्र एकमेकांपासून दूर राहणाऱ्या कपलसाठी नातं सांभाळणं बरंच अवघड असतं. अनेकदा जवळ राहात असूनही कपलमध्ये गैरसमज होतात. अशात लॉन्ग डिस्टन्समध्ये (Long Distance Relationship) तर काय अवस्था होत असेल याचा विचार तुम्ही करू शकता. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलचा एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण थोडासा गैरसमजही त्यांचं नातं कमकुवत बनवतो. या नात्यात एकमेकांना भेटण्याची इच्छा बराच मोठा रोल प्ले करते.

शेजारणीचं नाव काढताच पतीनं दिलं असं उत्तर, की चढला पत्नीचा पारा; मजेशीर VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका मुलीनं आपल्या लॉन्ग डिस्टन्स बॉयफ्रेंडला दिलेल्या सरप्राईजचे फोटो व्हायरल होत आहेत. ही तरुणी बऱ्याच दिवसांनंतर आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी लांबून आली होती. मात्र, व्हायरल होणारे फोटो (Viral Photos) पाहून तुमच्याही हे प्रकरण लक्षात येईल. नेटकऱ्यांनी या मुलीला सल्ला दिला की तिनं हे नातं संपवायला हवं. मुलाची रिअॅक्शन रेड फ्लॅग वाटली, जणू त्याला या नात्यात काहीच रस नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर @laurenzarrasTikTok नावाच्या अकाऊंटवरुन या तरुणीनं 22 सप्टेंबरला एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात तिनं आपल्या प्रियकराला दिलेल्या सरप्राईज व्हिजिटचा व्हिडिओ (Surprise Visit Video) अपलोड केला होता. लॉरेन आपला प्रियकर रोब्बी याला भेटण्यासाठी अचानक त्याच्या घरी गेली. लॉरेनला अचानक आपल्या रूममध्ये बघून आधी तो हैराण झाला. एक सेकंद तो लॉरेनकडे पाहातच राहिला. यानंतर तो उठला आणि त्यानं लॉरेनची गळाभेट घेतली. अपलोड झाल्यानंतर हा व्हिडिओ आतापर्यंत दहा कोटीहून अधिकांनी पाहिला आहे. मात्र, यातील बहुतेकांची नजर या मुलाच्या बाजूलाच बसलेल्या तीन मुलींवरच पडली आहे.

बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; थरारक VIDEO

लॉरेन जेव्हा रुममध्ये आली तेव्हा तिचा प्रियकर आधीपासूनच तीन मुलींसोबत बसून बोलत होता. अशात लोकांनी लॉरेनला सल्ला दिला, की एकतर तिचा बॉयफ्रेंड रूममध्ये दुसऱ्या मुलीसोबत दिसला आणि दुसरं म्हणजे तिला समोर पाहून त्याची प्रतिक्रिया हे दोन्ही धोक्याची घंटी आहे. तिला अनेकांनी ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि यावर आलेल्या निगेटिव्ह कमेंटनंतर लॉरेननं आपल्या बॉयफ्रेंडचा बचाव केला. तिनं सल्ल्यासाठी सर्वांचे आभार मानले. मात्र, आपल्याला आपल्या बॉयफ्रेंडवर पूर्ण विश्वास असल्याचं तिनं म्हटलं. तिचा आपल्या प्रियकरावर विश्वास आहे आणि तिला माहितीये की तो तिला कधीच धोका देणार नाही.

First published:

Tags: Relationship, Viral news