• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: ट्रकमधून कोसळू लागला युवक; इतक्यात कार चालकानं जे केलं ते मन जिंकणारं

VIDEO: ट्रकमधून कोसळू लागला युवक; इतक्यात कार चालकानं जे केलं ते मन जिंकणारं

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ट्रकवर उभा आहे. तो काहीतरी सामान तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : लेखर तारिक फतेह सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी सोशल मीडियाच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट शेअर केली की ती लगेचच व्हायरल (Post Viral on Koo) होते. नुकतंच अशीच एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कूवर व्हायरल झाली आहे. यात एक व्यक्ती ट्रकवर उभा असल्याचं दिसतं. पुढच्याच क्षणी एका कार चालकानं असं काही केलं जे तुमचं मन जिंकेल. हा व्हिडिओ (Video Viral on Social Media) लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. यूजर्स यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. मुलानं आईला सुनावली आपल्या पुनर्जन्माची कहाणी; सांगितला मृत्यूचा थरारक अनुभव तारिक फतेह यांनी आपल्या कू अकाऊंट @Fatah वरुन व्हिडिओ शेअर करत लिहिलं, काही लोक असेही. केवळ 24 सेकंदाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ट्रकवर उभा आहे. तो काहीतरी सामान तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो दुसऱ्या बाजूला जात असतानाच त्याचा तोल जातो आणि तो ट्रकवरुन खाली रस्त्यावर पडू लागतो. हा व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न करतो. मात्र, वजनामुळे तो ट्रकला उलटा लटकतो. अशात हा व्हिडिओ पाहताना असं वाटतं, की या व्यक्तीसोबत काही दुर्घटना घडू नये. या दरम्यान एक कार त्या दिशेनं येते. या कार चालकानं जे काही केलं ते निश्चितच तुमचं मन जिंकेल. हा व्यक्ती ट्रकला लटकलेल्या व्यक्तीच्या जवळ जातो आणि त्या व्यक्तीला पुन्हा ट्रकवर चढण्यास मदत करतो. शेजारणीचं नाव काढताच पतीनं दिलं असं उत्तर, की चढला पत्नीचा पारा; मजेशीर VIDEO तारिक फतेह यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ शेकडो लोकांनी लाईक केला आहे. तर, 40 हून अधिकांनी तो शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी कार चालकाचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं लिहिलं, हे ह्यूमन स्पिरिट आहे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: