मुंबई, 13 जुलै : उन्हाळ्यात आणि पावसाळ्या बहुतांश लोक पिकनीक काढतात. ते पावसात किंवा पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात. मौजमजेसाठी बरेचसे वॉटर पार्कमध्ये जातात. पूर्वीच्या काळी मोजक्याच वॉटर पार्क होत्या. पण आता असे अनेक वॉटरपार्क उघडण्यात आले आहे. ज्यांमध्ये स्विमिंगपुल शिवाय इतरही अनेक वॉटर स्लाईड्स असतात. तुम्हाला वॉटरपार्कमध्येही अनेक राइड्स मिळतील. काही खूप उंच आहेत, काही वक्र आहेत. काही मजेदार आहेत तर काही भीतीदायक आहेत. या राइड्सचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक रांगा लावतात. मात्र कधी-कधी या राइड्स अपघाताचे कारणही ठरतात. अशाच एका राइड दरम्यान दोन मुलींसोबत विचित्र प्रकार घडला. या अपघातात एका मुलीच्या पाठीचे हाड मोडले, तर दुसऱ्या मुलीलाही दुखापत झाली. Video Viral : झेड प्लस सिक्योरिटी; आता तुम्ही टोमॅटो चोरुनच दाखवाच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन मुली राईडच्या मधोमध अडकलेल्या दिसल्या. वास्तविक, या राइड्सवर पाण्याचा प्रवाह चालू ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, घसरलेली व्यक्ती अगदी सहजतेने खाली जाते. पण आजकाल अनेक वॉटर पार्क उघडले आहेत, जिथे देखभालीच्या नावाखाली काहीच होत नाही. अशाच एका पार्कमध्ये या दोन मुली गेल्या. दोघेही स्लाइडच्या मध्यभागी अडकल्या होत्या. त्या दोघांनाही खाली जाता येत नव्हते. इथ पर्यंत सर्व ठिक होतं पण समस्या पुढे आली जेव्हा वरुन एक तिसरी व्यक्ती अगदी वेगाने खाली आली.
सहसा काही वॉटरपार्कमध्ये गार्ड असतात. जे खात्री करतात की आधी स्लाईडवर गेलेली व्यक्ती स्लाईडच्या बाहेर गेली की नाही आणि त्यानंतरच ते दुसऱ्या व्यक्तीला राईड करु देतात. मात्र या वॉटरपार्कमध्ये असं काहीही झालं नाही ज्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. या दोन तरुणी स्लाईडवर अडकल्या असताना वरुन जोरदार एक तिसरी व्यक्ती येऊन त्यांना धडकतो. ज्यामुळे त्या मुलीच्या पाठीचा कणा मोडला आणि ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता अनेक लोक वॉटरपार्कमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याचं सांगत आहे.