मुंबई, 13 जुलै : टोमॅटोचे भाव दिवसामागे वाढतच चालले आहेत. सध्या टोमॅटोचा भाव 150 ते 250 रुपये किलोवर पोहोचला आहे. यामुळे अनेक गृहिणीच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब झाले आहेत. तर त्यांच्या महिन्याच्या बजेटवर देखील परिणाम झाला आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील टोमॅटोसंदर्भात मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. काही लोकांनी ‘अप्रतिम टोमॅटो स्कीम’ही आणली आहे. तर काही लोक मोबाईलवर टोमॅटो गिफ्ट म्हणून देखील देत आहेत. म्हणजेच काय तर टोमॅटो सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. Desi Jugad : पाणी काढण्यासाठी व्यक्तीनं लावला जुगाड; Video पाहून नक्कीच कराल कौतुक काही दिवसांपूर्वी एका टोमॅटो विक्रेत्याने आपले टोमॅटो चोरीला जाण्यापासून वाचवण्यासाठी भन्नाट जुगाड लावल्याचे तुम्ही पाहिले असेल. यासाठी या विक्रेत्याने सीसीटीव्ही कॅमरा लावला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आले. पण आता हे टोमॅटोसंदर्भात आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. जो टोमॅटोच्या झे-प्लस सिक्योरिटाचा आहे. ज्यामध्ये टोमॅटोचे रक्षण करण्यासाठी चक्क एक किंग कोब्राच आला आहे. हा व्हिडीओ पाहून इंटरनेट पब्लिकला धक्का बसला आहे. ही क्लिप पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने किंग कोब्रा टोमॅटोचे रक्षण करत असल्याचे निदर्शनास आणले! Viral Video : मस्करीची झाली कुस्करी, भुकेनं व्याकूळ मगरीसमोर मित्राला फेकलं आणि… ही धक्कादायक क्लिप पोस्ट करत स्नेक कॅचरने लिहिले - टोमॅटो खजिन्यापेक्षा कमी नाही, एक धोकादायक साप त्याचे रक्षण करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की कोब्रा टोमॅटोच्या मध्यभागी बसून त्याचे संरक्षण करत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्हाला कोब्राचा जोरात फुसकारण्याचा आवाज ऐकू येतो. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ ‘मिर्झा मोहम्मद आरिफ’ (mirzamdarif1) या इंस्टाग्राम वापरकर्त्याने 11 जुलै रोजी पोस्ट केला होता. मिर्झा हे साप पकडण्याचे काम करतात आणि प्राणी बचाव सेवा चालवतात. ते इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर साप रेस्क्यू व्हिडीओ देखील पोस्ट करतात, जे लोकांना खूप आवडतात. त्यांच्या या व्हिडीओवर देखील लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.