मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता कुणीच Single राहणार नाही! फक्त बाटली उघडताच तुम्हाला मिळेल Perfect life partner

आता कुणीच Single राहणार नाही! फक्त बाटली उघडताच तुम्हाला मिळेल Perfect life partner

चीनमध्ये ब्लाइंड बॉक्स डेटिंगमार्फत शोधला जातोय पार्टनर.

चीनमध्ये ब्लाइंड बॉक्स डेटिंगमार्फत शोधला जातोय पार्टनर.

चीनमध्ये ब्लाइंड बॉक्स डेटिंगमार्फत शोधला जातोय पार्टनर.

बीजिंग, 03 डिसेंबर : पूर्वी घरातील मंडळी लग्न ठरवत असत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत लग्नाचं स्थळ यायचं किंवा विवाह सूचक मंडळाची मदत घेतली जायची. तर काही लोक प्रेमविवाह करतात, आधी मैत्री आणि मग त्यांच्यात प्रेम फुलतं. आता तर काय ऑनलाईन वेडिंग वेबसाईट आणि डेटिंग साईट उपलब्ध झाल्या आहेत. ज्यात दोन अनोळखी व्यक्ती ऑनलाइन डेटिंग करून आपल्यासाठी लाइफ पार्टनर निवडतात (Dating tips). पण तरीही बरेच लोक सिंगल (Single) आहे आणि अशा व्यक्तींसाठी लाइफ पार्टनर शोधण्याचा हटके मार्ग चीनमध्ये अवलंबला जातो आहे (Blind box dating).

तुम्हाला आश्चर्य वाटेल चीनमध्ये चक्क बाटल्यांमध्ये (Blind box dating) लाइफ पार्टनर शोधला जातो. सिचुआन प्रांतातील चेंगडू शहरात एक असं दुकान आहे, जिथं बाटल्यांमध्ये पार्टनर शोधायला मिळतो. हे असं दुकान आहे, जे शहरात कुणालाही सिंग राहू देणार नाही. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार सिंगल राहणं बंद करा अशीच या दुकानाची थीम आहे.

सिंगल असलेल्यांसाठी इथं विशिष्ट सोय करण्यात आली आहे, जेणेकरून ते स्वतःसाठी पार्टनर शोधतील. या दुकानात काही बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. या बाटल्यांना ब्लाइंड बॉक्स म्हटलं जातं. या बाटल्यांमध्ये काही व्यक्तींची वैयक्तिक माहिती ठेवण्यात आली आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबाबत माहिती मिळवू शकता आणि तिच्याशी संपर्क साधू शकता. जर त्या व्यक्तीसोबत तुमचं जुळलं तर तुम्ही सिंगल राहणार नाही.

हे वाचा - बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा'

दुकानात मिळणाऱ्या या सेवेसाठी ग्राहकांकडून पैसे आकारले जातात. ग्राहकांना यासाठी 4.7 डॉलर म्हणजे 350 रुपये खर्च करावे लागतात. तुम्ही पैसे देऊन दुकानातील बाटलीत तुम्ही माहिती ठेऊ शकता. दुसरी व्यक्ती पैसे देऊन तुमची ही माहिती मिळवू शकतो. जर ब्लाइंड बॉक्समधून मिळालेल्या माहितीने समाधान झालं नसेल तर दुसऱ्या पार्टनरसाठी जास्त किंमत देऊन हाय क्वालिटी इन्फो मिळू शकते. या पॅकेजमध्ये पार्टनर मिळण्याची शक्यता अधिक वाढते.

हे वाचा - Friendship साठी एकमेकांच्या तोंडात करतात उलटी; घट्ट मैत्रीसाठी विचित्र पद्धत

जोडीदार शोधण्याच्या या विचित्र पद्धतीमुळे सर्वजण खूश आहेत असं नाही. यावर बरीच टीकाही केली जाते आहे. काही वकील आणि सोशल मीडिया युझर्स याला विरोध करत आहेत. लोकांना एखाद्या उत्पादनाप्रमाणे खरेदी-विक्री करण्याचा हा मार्ग आहे. वैयक्तिक आयुष्यावर हा घाला असल्याचं म्हटलं जात आहे. खासगी माहितीचा गैरवापर होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: China, Couple, Lifestyle, Relationship, Relationship tips