मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? मजुराचा हा डान्स VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? मजुराचा हा डान्स VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला खरच मायकल जॅक्सनला डान्स करताना पाहिल्यासारखं वाटेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 05जुलै : किंग ऑफ पॉप या नावानं ओळखला जाणारा मायकल जॅक्सन आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. 2009मध्ये जॅक्सनचा मृत्यू झाला, मात्र आजही त्याच्या चाहत्यांसाठी तो जिवंत आहे. जॅक्सनचा मून वॉक असो किंवा त्याची गाणी, आजही लोकांचा थिरकायला भाग पडते. सध्या एका अशाच जॅक्सन फॅनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म तर झाला नाही ना, असा प्रश्न पडले.

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं या एका मजुराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा मजुर हुबेहुब मायकल जॅक्सन सारखा डान्स करत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बिल्डिंगचे काम करणारा मजूर नाचताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज पाहून वीरूलाही व्हिडीओ शेअर केल्याशिवाय राहावले नाही.

View this post on Instagram

Michael Jackson reincarnated

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

वाचा-OMG! पक्ष्याची हिंमत तर पाहा शार्कसारख्या माशालाच घेऊन उडाला; VIDEO VIRAL

हा डान्स व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. वीरूने हा व्हिडीओ अपलोड करताना मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर चाहत्यांनाही हा जॅक्सन 2.0 असल्याचे म्हंटले आहे. तर, हा व्हिडीओ चीनमधील हुबेई प्रांतातील असल्याचे एका ट्वीटर युझरनं म्हटलं आहे.

वाचा-VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि...

विरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा क्रिकेटपटू आहे. वीरू कायम मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो.

वाचा-बेबी मुव्हमेंटच्या VIDEO त प्रेग्नंट महिलेला दिसलं असं काही; तुमचाही उडेल थरकाप

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 5, 2020, 10:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या