Home /News /viral /

VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि...

VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि...

कोरोनाच्या महासंकटात लग्नाचं फोटोशूट करणाऱ्या एका कपलसोबत मोठी दुर्घटना घडली

    न्यूयॉर्क, 03 जुलै: कोरोनाच्या महासंकटातही अनेक जण लग्न समारंभ आणि फोटोशूट करताना दिसत आहेत. कोरोनासोबत जगण्याची सवय करायला हवी असं म्हणत अनेकांनी घरगुती पद्धतीनं लग्न उरकून घेतली. लग्नातील किंवा लग्नाच्या आधीच्या अनेक गमती-जमती या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. मात्र याच कोरोनाच्या महासंकटात लग्नाचं फोटोशूट करणाऱ्या एका कपलसोबत मोठी दुर्घटना घडली आणि त्याचा LIVE थरारक व्हिडीओ समोर आला आहे. सात फेरे घेण्याआधीच दोन जीव वेगळे होता होता या दुर्घनेतून वाचले आहेत. लग्न म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करण्याचे वेड असते मात्र हेच वेड जीवावर बेतू शकत हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. लग्नाआधी फोटो शूट करण्यासाठी समुद्रात गेलेल्या एका कपलसोबत मोठी दुर्घटना घडली. हे वाचा- VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता फोटो शूट सुरू असताना अचानक एक उंच लाट येते आणि त्यासोबत दोघंही वाहून जातात. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाईफगाइड असल्यानं त्यांनी या दोघांचे प्राण वाचवले. मात्र जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं फोटोशूट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ABC ने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका जोडप्याने समुद्राद्वारे लग्नाच्या लग्नाचे फोटोशूट केले होते. हे कपल स्वत: ला फोटोसाठी तयार करत असताना एक मोठी उंच लाट आली आणि त्या दोघांना पॅसिफिक महासागरामध्ये घेऊन गेली. सुदैवानं तिथे लाइफगार्ड उपस्थित होते त्यांनी या दोघांचेही प्राण वाचवले आहेत. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या