वॉशिंग्टन, 02 जुलै : आपल्या प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपायला प्रत्येकाला आवडतं. अशाच पद्धतीने आपल्या पोटातील बाळाची हालचाल (baby bump movement) टिपण्याचा प्रयत्न एका महिलेनं केला. मात्र हा व्हिडीओ (video) पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. या व्हिडीओत तिला असं काही दिसलं जे तिथं ना व्हिडीओ शूट करताना होतं, ना तिनं उघड्या डोळ्यानं कधी पाहिलं होतं आणि हा व्हिडीओ पाहून तिला घामच फुटला. अमेरिकेतील ही प्रेग्नंट महिला (pregnant woman) घरात एकटी राहत होती. ही महिला आपल्या पोटातील बाळाची हालचाल आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत होती. त्यावेळी तिची मांजर विचित्र आवाज काढत होती. मात्र महिलेनं त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर या महिलेनं जेव्हा आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ पुन्हा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. या व्हिडीओत आपण पाहू शकतो तिला एक सावली दिसली. डेली मेल च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतल्या मलाकाई जेम्स या महिलेनं रेडिटवर (Reddit) हा व्हिडीओ टाकला आहे. ही घटना आपल्या छोट्या बहिणीसह घडल्याचं तिनं सांगितलं. आपल्या बहिणीसह एक मांजर आणि एक कुत्रा राहतो. हे वाचा - जंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप मलाकाईने सांगितलं, तिची बहीण गरोदर आहे आणि ती बेबी मुव्हमेंटचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिला मांजरीचा आवाज आला. मांजर एका ठिकाणी पाहून ओरडत होती. जेव्हा तिच्या बहिणीने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिला काही दिसलं नाही, मात्र जेव्हा तिनं व्हिडीओ पाहिला तेव्हा ती मोठ्याने किंचाळली. या व्हिडीओत तिला एक विचित्र सावली दिसत होती. जी पुन्हा पुन्हा येतजात होती. हे वाचा - FACT CHECK - Budweiser कर्मचारी 12 वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता? हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या प्रतिक्रियांना उत्तर देताना मलाकाईने सांगितलं, आता आपली बहीण ठिक आहे. मात्र तिला त्या घरात खूप अस्वस्थ वाटतं. आपल्यावर सतत कुणीतरी पाळत ठेवतं आहे, असं तिला वाटतं. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







