वॉशिंग्टन, 03 जुलै : पक्ष्याने उडता उडता पाण्यातील माशाला पकडणं तसं काही नवं नाही, मात्र तुम्ही एखाद्या शार्कसारख्या भल्या मोठ्या माशाला पक्ष्याने (bird flying with shark fish) उचलल्याचं कधी पाहिलं आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही. शार्कसारख्या माशाला एखादा पक्षी कसा काय उचलू शकतो. तर असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. एका पक्ष्याने समुद्रावर उडता उडता शार्कसारख्या या माशाला पकडलं आणि त्याला पकडून तो आकाशात उडत राहिला. हा व्हिडीओ अमेरिकेच्या मायर्टल बीचवरील असल्याचं सांगितलं जातं आहे. दक्षिण कॅरोलीतील केली बर्बेज नावाच्या व्यक्तीने हे दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि फेसबुक, ट्विटरवर शेअर केलं. त्यानंतर ट्रॅकिंग शार्क्सने हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.
Anyone know what type of bird this is and is it holding a shark? #myrtlebeach 📽 Kelly Burbage pic.twitter.com/gc59xihiM7
— Tracking Sharks (@trackingsharks) June 30, 2020
हा पक्षी कोण आहे हे माहिती नाही. शिवाय हा मासा नेमका शार्कच आहे का हेदेखील माहिती नाही. मात्र काही असलं तरी इतक्या मोठ्या माशाला पक्षी घेऊन उडताना तर आपण कधीच पाहिलं नाही. हा मासादेखील पक्ष्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. मात्र त्याचा हा प्रयत्न काही यशस्वी होताना दिसत नाही. हे वाचा - VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि… हा पोस्ट शेअर करताना ट्रॅकिंग शार्क्सने हा पक्षी आणि हा मासा नेमका कोण आहे, हे ओळखण्यास नेटिझन्सना सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. पक्ष्याची ओळख सांगताना बहुतेकांना हा पक्षी ऑस्प्रे असल्याचं सांगितलं आहे, जो मोठ्या माशांची शिकार करतो. तर माशाची ओळख पटवताना काहींना लेडीफिश, तर काहींनी हा स्पॅनिश मॅकरेल असल्याचं म्हटलं आहे. संपादन - प्रिया लाड

)







