कीव, 03 सप्टेंबर : कधीकधी लोक असे काही विचित्र प्रकार करतात की पाहून आपल्यालाच विश्वास बसत नाही. यावर हसायचं की रागवायचं असा प्रश्न पडतो. असाच एक अजब प्रकार विमानात घडला. एका महिलेने असे एक कृत्य केले आहे जी सोशल मीडियावर बरीच चर्चा शेअर करत आहे. या महिलेला गरम व्हायला लागलं म्हणून ती चक्क इर्मजन्सी डोअर ओपन करून विमानाबाहेर आली, आणि विमानाच्या पंख्यावर फिरू लागली.
द सनच्या वृत्तानुसार, ही युक्रेनची घटना आहे जिथे इर्मजन्सी रेस्पॉन्स टीमने एका महिलेला विमानाच्या विंग्जमधून खाली उतरण्यास सांगितले. रिपोर्टनुसार, तुर्की येथून उड्डाण घेतल्यानंतर एक विमान युक्रेन विमानतळावर उतरले, तेथे विमानात बसलेल्या एका महिलेने अचानक इर्मजन्सी डोअर उघडला आणि विंगवर फिरण्यासाठी गेली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती महिला विंगवर चालत असताना दिसत आहे.
वाचा-फ्लाइट अटेंडंटनं विमानात मारली फ्लिप, VIDEO मुळे एका रात्रीत झाली स्टारवाचा-आकाशातून एक दगड खाली पडताच अख्खं गाव झालं श्रीमंत, वाचा नेमकं काय घडलंकारण विचारल्यावर म्हणाली, 'गरम होत होतं'
युक्रेन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सनेही या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार पीएस 6212 विमानाचा क्रमांक अंताल्याहून कीवकडे जात होते. युक्रेन विमानतळावर टर्मिनल डीच्या गेट 11 जवळ थांबल्यानंतर एका महिला प्रवाशाने विमानाच्या इर्मजन्सी डोअर उघडून फिरण्यास सुरुवात केली.
वाचा-पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, 100 फूटांवर अशी आली खाली
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तुर्कीच्या अंताल्यामध्ये सुट्टीनंतर परत येत होती. जेव्हा विमान युक्रेनच्या कीवमध्ये उतरले तेव्हा तिला गरम व्हायला लागले म्हणून तिने विमानाचा इर्मजन्सी डोअर उघडला आणि विंगवरुन चालू लागली. या घटनेनंतर महिलेला युक्रेन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.