ताईपई, 01 सप्टेंबर : तैवानमध्ये सध्या पतंग महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र हा कार्यक्रमादरम्यान एक भयंकर प्रकार घडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महोत्सवादरम्यान एका मोठ्या पतंगाला एक 3 वर्षांची चिमुरडी अडकली. बघता बघता ही चिमुरडी हवेत उडी लागली. तब्बल 100 फूट उंच गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले.
हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी भला मोठा पतंग उडवत असताना अचानक वाऱ्याबरोबर उडून गेली. 100 फूट वर गेल्यानंतर अचानक मुलीचा हात निसटला आणि ती खाली पडली. तेवढ्यात खाली उभ्या असलेल्या जमावानं तिला पकडले आणि मुलीचा जीव वाचला. मुलीला किरकोळ दुखापत झाली.
वाचा-पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, 7 महिन्यांनी घरी परतली
(Breaking News)
On the beach in northern Taiwan, a little girl was caught by a kite then flied into 10 meters high in the sky pic.twitter.com/FjYWo1McH7
— Yugin 豐田苗美 (@Yugin39163494) August 30, 2020
वाचा-...आणि महिलेच्या शरीरात शिरला 4 फूट लांब साप, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO
जोरदार वाऱ्यामुळे ही मुलगी उडून गेली. मात्र योग्यवेळी लोकांनी या चिमुरडीचा जीव वाचवला. हा प्रकार घडल्यानंतर तैवानमधील हिन्शू गावात प्रशासनानं पंतग महोत्सव स्थगित केला.