वॉशिंग्टन, 02 सप्टेंबर : फ्लाइट अटेंडंट या कायम लोकांची मदत करण्यासाठी विमानात असतात. मात्र सध्या एक फ्लाइट अटेंडंट आपल्या स्टंटमुळे सोशल मीडियावर स्टार झाली आहे. आपल्या फ्लेक्सिबिलिटी आणि अॅरोबॅटिकमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. 35 वर्षीय लिंडसे ओ ब्रायन असे या केबिन क्रु मेंबरचे नाव असून विमानात सीटवरच्या ओव्हरहेड कम्पार्टमेंट बंद करण्यासाठी ती चक्क फ्लिप मारताना दिसत आहे. तिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये लिंडसे खुर्चीचा वापर करून फ्लिप मारताना दिसत आहे. वाचा- आकाशातून एक दगड खाली पडताच अख्खं गाव झालं श्रीमंत, वाचा नेमकं काय घडलं
वाचा- VIDEO - व्वा गं झाशीची राणी! वार झेलले पण चोरांना मुलीने घडवली चांगलीच अद्दल मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ जून महिन्याचा आहे. लिंडसे यांनी SWNSला दिलेल्या माहितीत सांगितले की तिला स्टंट करायला आवडतात. तसेच, या स्टंटमुळे मी एकाच वेळा चार ओव्हरहेड कम्पार्टमेंट बंद करू शकते, असेही सांगितले. मुख्य म्हणजे लिंडसेनं हा स्टंट करण्यासाठी 20 वेळा याचा सराव केला होता. वाचा- VIDEO :नागाच्या दमदार एन्ट्रीमुळे ट्रॅफिक जाम; महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा तसेच, लिंडसे शाळेत असताना चीअरलीडर होती. त्यामुळे तिला अॅरोबिक्सची आवड होती. लहानपणी ती योगाही करत असे, त्यामुळे तिच्यातील लवचिकता कायम आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही क्षणाच लिंडसे सोशल मीडिया स्टार झाली आहे.