मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आकाशातून एक दगड खाली पडताच अख्खं गाव झालं श्रीमंत, वाचा नेमकं काय घडलं

आकाशातून एक दगड खाली पडताच अख्खं गाव झालं श्रीमंत, वाचा नेमकं काय घडलं

आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे? नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला.

आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे? नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला.

आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे? नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला.

    ब्राझिलिया, 02 सप्टेंबर : आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे? नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला. ब्राझिलमधील एका गावात आकाशातून खाली उल्का पडल्या. एवढेच नाही तर, या उल्काची किंमत 20 हजार युरो म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे 20 लाख किंमत असल्याचे सांगितले जात आहे. इंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, हा दगड येथील सांता फिल्मोमेना गावात पडला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली. असे मानले जात आहे की, आकाशातून खाली पडलेली ही उल्का 4.6 दशलक्ष वर्ष जूनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही उल्का फार क्वचित सापडली जाते, तसेच, या गावात सापडलेल्या उल्काचा हा 10 टक्के भाग आहे. वाचा-पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, 100 फूटांवर अशी आली खाली ही उल्का पडली तेव्हा, काही विद्यार्थ्यांनी पाहिले. सांता फिल्मोमेना या गावात जास्त करून शेतकरी राहत करतात. शेतात काम करत असताना काही लोकांचा हाती ही उल्का आली. येथील एका प्रोफेसनं सांगितले की, या उल्काच्या मदतीने पृथ्वीच्या निर्माणाबाबत माहिती मिळू शकते. वाचा-...आणि महिलेच्या शरीरात शिरला 4 फूट लांब साप, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO स्थानिक लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोकांनी लाखो रुपये मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकांना आकाशातून पैसे पडल्याचे सगळ्यांना सांगितले. या अफवेनं काही काळ गावात चिंतेचे वातावरण होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या