जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडली तरुणी, Video Viral

आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडली तरुणी, Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

मुंबई 24 जानेवारी : दुचाकी किंवा स्कूटी घेऊन रस्त्यावर निघताना नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हेल्मेट हे पोलिसांनी दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वत: च्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. पण असं असलं तरी देखील काही तरुण मंडळी या गोष्टींना गांभिऱ्याने घेत नाही आणि मग त्यांचं नुकान होणं सहाजिकच आहे. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. अशाच एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 24 जानेवारी : दुचाकी किंवा स्कूटी घेऊन रस्त्यावर निघताना नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हेल्मेट हे पोलिसांनी दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वत: च्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. पण असं असलं तरी देखील काही तरुण मंडळी या गोष्टींना गांभिऱ्याने घेत नाही आणि मग त्यांचं नुकान होणं सहाजिकच आहे. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. अशाच एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तसं या मुलीसोबत घडलेली घटना गंभीर आहे. पण तिच्यासोबत जे काही होतं, त्या सगळ्यासाठी ती स्वत: जबाबदार आहे. हे ही पाहा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी स्कूटी चालवताना हेल्मेटशिवाय रस्त्यावरून जात आहे, तेवढ्यात मागून एक बाईकस्वार येतो आणि तिला सांगतो की पुढे नाका असेल तिथे तुला पकडतील हेल्मेट घाल, त्यावर ती मुलगी म्हणते की नाही पकडणार. यावर हा बाकिस्वार तिला ओके म्हणतो. काही सेकंदांनंतर मात्र या तरुणीला चांगलीच अद्दल घडते. पुढे एका पुलाच्या सुरुवातीला एक दुचाकीस्वार थांबलेला असतो. त्याला ही मुलगी पाहात नाही, ज्यामुळे तिची स्कूटी थोडी पुढे जाऊन बँलेंस बिघडतो आणि ती बाजूला पडते. या घटनेमुळे तरुणीला हाताला खर्चटलं आहे. पण तिला फारसं काही झालं नाही. यानंतर ती मुलगी उठते. ज्यानंतर व्हिडीओ शुट करत असलेला तरुण या मुलीला आपल्या मागे येऊन बसायला सांगतो. ज्यानंतर ही मुलगी दाखवते की तिच्या हाताला लागलं आहे.

जाहिरात

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवली. इतकेच नाही तर काही युजर्सनी व्हिडीओ पाहिल्यानंतर हे सर्व स्क्रिप्टेड असून हे लोक फक्त अभिनय करत असल्याचेही म्हटले आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. फोन चोरुन पळाला चोर, मग काय फिल्मी स्टाईलमध्ये लोकांनी असं काही धुतलं की बस्स… पाहा Video हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर कश्यप_मेमर नावाच्या युजरने शेअर केला असून त्याला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “मग स्कूटी कुठे गेली?” दुसऱ्या युजरने लिहिले की, “मला स्क्रिप्टेड वाटत आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात