मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि... पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक

महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि... पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक

धक्कादायक व्हिडीओ

धक्कादायक व्हिडीओ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 03 जानेवारी : सोशल मीडियावरील काही व्हिडीओ हे लोकांचे झोप उडवणारे असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ बाईक चालवणाऱ्या महिलेचा आहे.

आता तुम्ही म्हणाल की, त्यात काय एवढं? अशा अनेक महिला आहेत, ज्या रस्त्यावर बाईक चालवतात. मग आता या महिलेनं कोणाला त्रास दिला किंवा कोणाला गाडी ठोकली का? तर नाही. या महिलेनं असं काहीच केलं नाही. पण या सगळ्यात महिलेनं एक गोष्ट केली, जे करण्याचा विचार कोणीही करु शकणार नाही.

हे ही पाहा : जोडप्याचं विचित्र कृत्य; चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट... Video पाहून सगळ्यांना बसला धक्का

या महिलेनं विनाकपडे बाईक चालवली. हो हे खरं आहे. या महिलेनं विनाकपडे गाडी चालवून सगळीच मर्यादा ओलांडली. ही महिला कपड्यांशिवाय स्कूटी घेऊन रस्त्याच्या मधोमध धावत होती. यानंतर पोलीस तेथे पोहोचल्यावर महिलेनेही पोलिसांशी गैरवर्तन केले. अखेर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नक्की असं काय घडलं?

वास्तविक, ही घटना ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व राज्यातील एस्पिरिटो सँटो येथील आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी विला वेल्हाहून व्हिटोरियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. रिपोर्टनुसार, जेव्हा काही लोकांनी महिलेला पाहिले तेव्हा त्यांना काय करावे हे समजत नव्हते कारण ती महिला तिची स्कूटी घेऊन खूप वेगाने धावत होती.

हे ही पाहा : शेकोटी घेण्यासाठी लावलेला जुगाड असा फसला, आता आयुष्यभर राहिल लक्षात; पाहा Viral Video

यानंतर काही लोकांनी महिलेला चौकाचौकात पाहिल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा त्यांच्या कारमधून पाठलाग केला आणि तिला पकडले.

आधी पोलिसांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पोलिसांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला. यानंतर महिलेला पुन्हा पकडण्यात आले, यादरम्यान महिलेला काही कपडेही घालण्यात आले.

आता प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात असेल की महिलेने असे का केले?

तर महिलेने असे का केले याची पुष्टी होऊ शकली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण ही महिला कोणत्या तरी मानसिक स्थितीत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. ती कोणत्यातरी गोष्टीसाठी निदर्शन करत होती, असं देखील सांगितलं जातं.

First published:
top videos

    Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Viral photo