मुंबई 02 जानेवारी : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ समोर येईल याचा काही नेम नाही. इथे नेहमीच असे काही व्हिडीओ ट्रेंड होत असतात, जे कधी मनोरंजक असतात, तर कधी विचार करायला भाग पाडणारे. सध्या समोर आलेला व्हायरल व्हिडीओ देखील असाच आहे. हा व्हिडीओ लोकांनी पाहताना तसा मनोरंजक वाटत आहे. पण असं असलं तरी देखील हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. जर सगळी माणसं एकत्र आली तर तुम्हाला नुकसानापासून वाचता येऊ शकतं. तसेच यावरुन असं देखील लक्षात येतं की तुम्ही जर एखाद्याला मदत करण्याचा विचार केला तर त्यामुळे समोरच्याचा किती फायदा होऊ शकतो ते. हे ही पाहा : Viral Video: चोरी करताना पकडल्यावर व्यक्तीचं असं कृत्य, पाहून पकडाल डोक हा व्हायरल व्हिडीओ चोरीचा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एका महिलेचा फोन घेऊन पळून जातो. तेव्हा त्याच्यासोबत जे घडलं ते खरंच पाहण्यासारखं आहे.
खरंतर रस्त्याच्या कडेला एका महिलेच्या हातातून एक व्यक्ती फोन घेऊन पळाला. त्यावेळी त्याला थांबवायला एक कार वाला पुढे आहे आणि त्याने गाडी थेट या चोरावर नेली. तरी देखील या चोराने तेथून पळ काढला. पण असं असलं तरी देखील चोराला अपघातामुळे जास्त जोरात पळता आलं नाही. अखेर पुढे गेल्यावर काही लोकांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पकडलं देखील. एवढंच नाही तर लोकांनी अगदी हात साफ करुन घेतला आणि चोराला मार-मार मारलं. यामुळे चोर देखील पकडला गेला आणि या महिलेला तिचा फोन देखील मिळाला.
हा व्हिडीओ Instant Karma नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला व्ह्यूज देखील चांगले आले आहेत.

)







