मुंबई 29 डिसेंबर : सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला देखील हसू आवरनार नाही. हा व्हिडीओ दोन तरुणांशी संबधीत आहे. ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्याच्या पाकिटातून चोरी करतो. पण आपण पकडलो गेलो असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं त्यानंतर तो जे करतो ते पाहण्यासारखं आहे.
हा व्हिडीओ परदेशातील व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक तरुण चष्मा लावून खूर्चीवर बसला आहे. तो असा काही बसला आहे की पाहाताना वाटत आहे की तो झोपला असावा. याचाच फायदा घेत दुसरा तरुण त्याच्या जवळ जातो आणि त्याचं पाकिट काढून त्यामधील पैसे काढतो. हे ही पाहा : चोराचं नशीब खराब की दुकानदार हुशार? हा Video पाहून तुम्हीच ठरवा पण हा चोर एवढ्यावर थांबत नाही. तो या तरुणाने लावलेला गॉगल देखील चोरण्याचा प्रयत्न करतो. मात्र तेव्हा त्याचं सर्व पितळ उघडं पडतं. कारण जेव्हा चोर या झोपलेल्या व्यक्तीचा गॉगल काढतो, तेव्हा त्याला दिसतं की ही व्यक्ती झोपलेली नाही तर आपण केलेलं कृत्य या व्यक्तीनं पाहिलं आहे. ज्यानंतर तो पुन्हा हळूच घेतलेले पैसे पाकिटात ठेवतो आणि असं भासवतो की आपण काहीच केलेलं नाही.
— videos to see shitting (@videoshitting) October 20, 2022
चोरी करताना पकडला गेल्यावर या चोराच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. तसा हा व्हिडीओ पाहात तो मुद्दाम कन्टेन्टसाठी केला गेला असावं असंच वाटत आहे. पण याचं सत्य काही समोर आलेलं नाही. हे ही पाहा : मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही… हा Video पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल हा व्हिडिओ आऊट ऑफ कॉन्टेक्स्टने त्याच्या सोशल मीडिया ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी त्याला लाईक केलं आहे. यावर लोकांच्या भरभरुन कमेंट्स देखील आलेल्या आहेत.